अनुभव
अनुभव
जीवनात अनुभवासारखी
नाही कुठे शिदोरी
कोणासही विचारा
असते ती सर्वांच्या उदरी----
अनुभवाच्या बोलीने
होई उपरती
पुढच्यास ठेच मागचा शहाणा
हे सार्थ ठरती -----
अनुभवामुळे मिळते
जीवनास गती
कार्य करताना
वापरावी मती -----
शिक्षण आणि अनुभव
याची जमेल जेव्हा जोडी
तेव्हाच बसेल
आयुष्याची छान घडी