भावबंध
भावबंध
1 min
449
लेक उंबरा घराचा
जाते माहेर सोडून
होई क्षणात परकी
दोन घरटी जोडून
भावबंध मनातले
लेक सारेच जाणते
घालमेल जीवा न्यारी
डोळा धार ही लागते
माहेरात ही पाहुणी
होते एकाच क्षणात
नांदे सुखात सासरी
सारे जुळवून घेत
लेक संस्कार शिदोरी
कुळे दोन उद्धारिते
पुण्य हे कन्यादानाचे
लेक जन्माने लाभते