Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vijay Sanap

Tragedy

3.4  

Vijay Sanap

Tragedy

वंशाचा दिवा

वंशाचा दिवा

1 min
20.7K

आस दिव्याची तू धरु नको

आई मला गर्भात मारु नको ---|| धृ ||

लाथळल्या लाथा खाईन मी

कर्माचे भोग भोगीन मी

नको आई तू घेऊ गं बळी

उमलु दे गं नविन कळी

कळीस कोवळया खुडू नको ---- ||१ ||

उद्याची मी घेईन गं हमी

नाही पडनार तुला गं कमी

क्रुरपणाचा कर तू त्याग

फुला फळाणी बहरेल बाग

चिंता उद्याची करूनको------ ||२||

स्वप्न माझे होऊ दे साकार

जगाण्याचा मज दे अधिकार

सत्याचा तू कर गं विचार

राग तुझा गं होईल दुरं

त्याग माझा तू करू नको ---- || 3 ||

पणती दिव्याचा सम प्रकाश

का मग दिव्याची धरते आस

वंशाचा दिवा करीन का सेवा

काशीला तुजला नेईल का तेव्हा

मनी भाव तू आणू नको -------- || ४||

आभाळागत तुझी गं छाया

सागरा समान तुझी गं माया

जन्मा आधी तू मारती कशाला

नस्ता पाप तू करती कशाला

धन दौलत मज काही नको ----||५||

Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy