मिरगाची छाया
मिरगाची छाया
1 min
14.2K
झाला सरला उन्हाळा
पडे मिरगाची छाया
रोज पाहे नभाकडे
त्याची मेघावर माया ।।
आला मृृगाचा पाऊस
बळी पाडतोया सरी
राब राबून उन्हात
आस बांधतोया उरी ।।
सर्जा राजा सोबतीला
हाकी शेतात नांगर
किती शिणला भागला
त्याला मातीचा आधार ।।
बळी जगाचा पोशिंदा
त्याच्या जिवाची आबळ
कर्ज करून उशाले
करी मुलांचा सांभाळ ।।
बैल जुपे नांगराले
बळी घालतो रे भले
राज्य येऊदे बळीचे
देवा बोलेे नवसाले ।।