Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vijay Sanap

Others

3  

Vijay Sanap

Others

पावसाने केली भलतीच कमाल

पावसाने केली भलतीच कमाल

1 min
292


पहिला दिवस शाळेचा

मित्रासंगे  खेळायचा

आमचे झाले खूपच हाल

पावसाने केली भलतीच कमाल ।।


शाळेमध्ये धिंगा मस्ती

वर्गामध्ये केली कुस्ती

बाईने धरले आमचे गाल

पावसाने केली भलतीच कमाल ।।


सरसर धारा पावसाच्या

येऊन आम्हा भिजवायच्या

आभाळाचा तुटला व्हॉल

पावसाने केली भलतीच कमाल ।।


आला पाऊस भिजली शाळा

मुले सारी झाली गोळा

गोळा होवून धरला ताल

पावसाने केली भलतीच कमाल ।।


सोसाट्याचा आला वारा

वाऱ्यासंगे आल्या गारा

पोरांचे मग झाले बे हाल

पावसाने केली भलतीच कमाल ।।


Rate this content
Log in