Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Manisha Potdar

Inspirational Others

2.6  

Manisha Potdar

Inspirational Others

लाडकी मायबोली

लाडकी मायबोली

1 min
449


मराठी आमुची लाडकी मायबोली ॥धृ ॥

जीवनाचे पहिले बोलं बोबडे बोली

गोष्ट चिऊकाऊची , गाणी चाऊमाऊची

गोष्ट सांगते शुरवीरांची आमुची माऊली

मराठी आमुची लाडकी मायबोली ॥ १ ॥


इतिहास हा उमगला तिच्या शब्दांनी

जगाची ओळख झाली तिच्या नजरांनी

पाठीवरी हात फिरवी मायेची मायबोली

मराठी आमुची लाडकी मायबोली ॥ २ ॥


आनंद व्यक्त होती, खळखळूनी हसती

सुखदु:खाची सोबती आमुची मायबोली

सुविचारांचे मंथन ज्ञानेश्वरी माऊली

मराठी आमुची लाडकी मायबोली ॥ ३ ॥


मराठी बाणा मराठी कणा मायबोली

माणूसपण घडविते मराठी मायबोली

भावणांचा फुलोरा अशी मायबोली

मराठी आमुची लाडकी मायबोली ॥ ४ ॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational