Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Prashant Shinde

Classics

1  

Prashant Shinde

Classics

समज गैरसमज...!

समज गैरसमज...!

1 min
526


आजकाल सोशल मीडिया मूळ

सारच कस पटकन पसरत

नकळत एका मागोमाग एक

हिंडी झुंडीन पाऊल खड्यात पडतं...!


तसच काहीसं आज झालं

त्यालाही कारण तसच गडलं

जागतिक पुस्तकाचं निमित्त झालं

आणि वाचन संकल्पाकडे मन वळलं...!


म्हंटल पहावं जरा वाचून

जाता जाता थोडं तपासून

गुगल गुरूला थोडं छेडलं तर त्यानं

23 एप्रिल तारखेच थोबाड दाखवलं...!


तरीपण म्हंटल शुभेच्छा द्यायला

काळ वेळ दिवसाची गरजच काय?

आणि मग संकल्पाची पण मुहूर्त मेढ

उभारण्याचा सोस तरी कशाला...!


उठलो सरळ पुस्तक वाचायला घेतलं

रोज एक तरी पान वाचायचं म्हंटल

सुरुवात झाली आणि सांगावं वाटलं

जाता जाता थोडं लिहून पहावं म्हंटल....!


संकल्प वाचनाचा पण केला

संकल्प लिहिण्याचा पण केला

आणि हाता बरोबर आपल्यालाही 

सांगण्याचा घाटही घातला...!


आता बरं वाटतंय

तुम्ही पण वाचत जा,पहात जा

आज पासूनच नियमित पणे

थोडे थोडे लिहीत पण जा...!


शिकेल तो टिकेल

वाचेल तो वाचेल हे पटते 

तसेच

लिहिलं तो पाहिलं 

पाहिल तो लिहिलं हे ही पटते...


म्हणून वाटते सांगावे ओरडून

कितीही डिजिटल झालं जग

तरी वाचन लिखाण सोडू नये

जून ते सोन हे कधी विसरू नये.....!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics