सुर जुळाले
सुर जुळाले
1 min
575
सुर जुळाले अंतरी
अंतरीया समाधान
देवा तुझा ध्यास मला
मला तुझा अभिमान।।
तुझ्यामुळे आज मज
मज आहे तुझा लळा
उपस्थिती तुझी आहे
आहे माझा तू सावळा ।।
जनासाठी किती माया
माया करितो अपार
दु:ख दु:खीतांचे हरे
हरे कैवल्य दातार ।।
पाणी कसे डोळी येती
येती नेत्रात कोठूनी
आंनदाचे मोर नाचे
नाचे गात्रात भरूनी ।।
प्रेम जपलय मनी
मनी उल्हास सभेत
श्वास सुगंधानी भरे
भरे फुले ही बागेत ।।
तुझे आहे प्रेम नातं
नातं आहे भरणारी
तुझी आहे मीरा प्रिया
प्रिया गाते दरबारी ।।