मना सांग मी मोहरावे
मना सांग मी मोहरावे
1 min
251
मना सांग मी मोहरावे किती रे
जराश्या सुखाने फुलावे किती रे...
सजा ही कशाची जरा सांग ना तू
स्वतःच्या मनाला छळावे किती रे..
मला वाटते की मला टाळतो तू
तुझ्या टाळण्यावर रडावे किती रे...
तुझ्या आठवांनीच व्याकूळ झाली
सखीने हृदय गुंतवावे किती रे...
सुखाचाच व्यापार दुःखात केला
आता वेदनेवर भजावे किती रे.....