Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Meenakshi Kilawat

Inspirational

4  

Meenakshi Kilawat

Inspirational

तीरंगा

तीरंगा

1 min
285



चालले स्वर्गात तीरंग्यात झोपूनी

चंद्र सूर्य ही गाती महती त्यांची

शहीद सैनिकानी दिली या

देशासाठी कुरबानी स्वता:ची।।


गुंफूनी भावना या अंतरी

आठवां शहीद सैनिका

शौर्याच्या तेजाने लकाकती

गगनात या तारका।।


देशसेवेत प्राणाची आहुती

कर्तव्याने फुलुनी येते

हौतात्म्य वीर वर्णितांना

अश्रृची माळ मी वाहते।।


लोकशाही कशी ही माजली

आंतकवाद हा घातपाती

माणसांच्या रक्षणाला उरले

ना कोणी इथे विभूती ।।


इथे घडल्या दंगली अन

बलिदानाची दिली आहुती

संसार धुडकविला विरांनी

अन देशसेवेची केली आरती।।


कर्तव्यनिष्ठ जवान ही

त्यागाची असे ज्वलंत मुर्ती

देशाला जिवनाची अमुल्य

भेट देवूनी पडले धरातिर्थी।।


आदरांजली वाहिली ही

शब्द सुमनांची भाव मुखडे

कामठे,करकरे व शहीदांना

कोटी प्रणाम ही तोकडे।।


Rate this content
Log in