आली दिवाळी
आली दिवाळी
1 min
414
आली दिवाळी
नको आई कपडे
सैनिक सीमेवर
फिरतात गं उघडे ।।
नाही उन वारा
नाही लागत थंडी
सदा असतात ते
तोफेच्या तोंडी ।।
त्यांना कधी आई
असती गं दिवाळी
कोण गं त्यांची
करते ओवाळी ।।
कसली आली पणती
अन् कसला गं दिवा
डोळ्यात तेल घालून
करतात देशाची सेवा ।।
आली दिवाळी
कसलं त्यांना उटणं
कोठे असेल ताई
कसं होईल भेटणं