दुष्काळ
दुष्काळ
1 min
453
असा पडला दुष्काळ
गेल्या विहीरी आटून
नद्या साऱ्या वांझ झाल्या
बसे डोंगरा खेटून ।।
गाव येथे दुष्काळानं
होरपळलाय सारा
गायी वासरं उपाशी
कोठे मिळेना रे चारा ।।
सारी भूई भेगाळली
उभी राहून उन्हात
तुझी मानवा करणी
कसं येईना ध्यानात ।।
झाडे हिरवी हिरवी
माना लागली टाकू
पिढ्या गणतीचा वड
कमरात लागे वाकू ।।
होता दुष्काळ पूर्वीही
नित सरी झडायच्या
उभ्या ओसरीच्या भिंती
अचानक पडायच्या ।।