रस्ता
रस्ता
1 min
291
रस्ता असो अवघड
जीवन प्रवास घडावा
येवो खाचखळगे तरी
मार्ग आपला निवडावा
तयारी प्रवासाची
करण्या लागे वेळ
तरी प्रत्येकानेच तो
खेळावा असा खेळ
प्रवासामधे उतरतात
प्रवासी कधी मधातच
वेड लागतो जीवाला
वळणावर थबकताच
शेवट व सुरुवात या
प्रवासाची गोड व्हावी
पुन्हा पुन्हा प्रवासाची
जीवा ओढ ती लागावी