Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

aishwarya sawant

Inspirational

4.5  

aishwarya sawant

Inspirational

भूक

भूक

1 min
566


इवलासा त्याचा जीव आणि बहिण होती हाताशी

गरीबीच्या छप्परांना भिंत बांधली जिद्दीची


आई बाप तर हारले होते आयुष्याला

शुन्यापासून सुरुवात झाली त्याची जगण्याला


जगाशी खूप लवकर ओळख झाली होती त्याची

भावाच्या खांद्यावर रमण्याची इच्छाच सुटली नव्हती तिची 


भिकेसाठी हात पसरतात त्याचे जेव्हा जेव्हा 

पाणावतात त्या बहिणीचे डोळे तेव्हा तेव्हा 


भातुकलीचा खेळ करून मग एक घास त्याला आणि स्वतःला ती भरवत 

बोबड्या शब्दात 'दादा, माझ पोट भरल हं' अशी नकल ती करत 


चिमुकल्या आपल्या बहिणीचे निरागस हे प्रेम पाहून 

आनंदाने हसावे की दुःखी होऊन रडावे हेच त्याला नसे कळत


तरी असंतुष्ट असलेला भाऊ वाटेल ते काम करून बहिणीची भूक भागवत


मिटलेले तिचे डोळे पाहून चंद्र तार्‍यांशी तो गप्पा मारत 

हळूच दगडाखालून मग पाटी आणि पेन्सिल काढत


वेदनांनी असह्य होऊन पुन्हा पुन्हा तो "आई" गिरवत 

भिजलेले ते डोळे मग त्या आईला हळूच मिठी मारत 


पण रोज भेटलेल्या चंद्र तार्‍यांना नेहमी प्रश्न पडे

भूक त्या चिमुरड्याची शिक्षणाची की आईच्या मायेची असे ?


Rate this content
Log in

More marathi poem from aishwarya sawant