Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Trupti Naware

Tragedy

3  

Trupti Naware

Tragedy

पाझर

पाझर

1 min
483


आतला पाऊस झिरपत होता

मी मुक्त होतं होते..बाहेरच्या कोशातून

एक सर दुसऱ्या सरीला सावरत होती

रेशमी स्पर्शाच्या मखमली बंधनातून

आतला पाऊस झिरपत होता

हृदयाचा प्रत्येक कप्पा चिंब चिंब करून

मी स्वतःला स्वाधीन केले त्याच्या

त्याच्यावर आभाळभर विश्वास टाकून

आतला पाऊस झिरपत होता

एखाद्याच नसणं,,.असण्यापरी समजून

त्याचा श्वासही थंडगार होता

प्रत्येक थेंबातल्या तुफानाला पेटवून

आतला पाऊस झिरपत राहिला .....

आतला पाऊस झिरपत राहिला ......

रक्तातचं..कबुलीचा पाझर बनून

मुक्त होताच आले नाही

त्याच्यासाठी ......त्याच्यातून..!!


Rate this content
Log in