अस्तित्व तुझे
अस्तित्व तुझे
1 min
344
तुझ्या आठवणीचे क्षण
मनात अजुनी रेंगाळतात
एकांती गुणगुणावीत हे
क्षण मधुर गीत होतात
सख्या रे" आवाज तुझा
कानात अजुनी घुमतो
शब्द कानी पडतात हे
चेहरा आनंदाने फुलतो
अस्तित्व सखे असे तुझे
जगण्याचे बळ असे माझे
तू माझ्यासाठीचे जीवन
मी तुजसाठीचे जीवन असे