Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Meenakshi Kilawat

Others

5.0  

Meenakshi Kilawat

Others

भारतीय संविधान

भारतीय संविधान

1 min
386


प्रजासत्ताक भारतात बघा

कशी माजली ही लोकशाही

नाही किंमत स्त्रीच्या अब्रृला

सडकेवरही बलात्कार होती काही।।


विवेकशक्तीचा नाश दिसतोय

वरचढ आंतकवाद हा घातपाती

मानवांच्या रक्षणाला उरले ना

कोणीच आता इथे दिव्य विभूती ।।


सत्तास्वार्थाचा बाजार केला काही 

लोभी लबाड संधी साधूंनी 

तरक्कीच्या नावावर लुबाडलेत 

पाशवी तमाच्या अधिपत्यानी ।।


राष्ट्रप्रेम,राष्ट्रभक्ती,राष्ट्रनिष्ठा

तिजोरीत बंद झालीच आहे

राष्ट्रगान, संविधानाची प्रतिज्ञाही

ठेवती बेशिस्तजन खिश्यात आहे ।।


मुलभूत गरजा सामान्य जनासाठी

स्वंयसेवी संघसंघटना उभारल्याय

विकास आणि प्रगतीच्या नावावर

गरीब,सोशितांना खुप लुबाडलय।।


होते पारतंत्र्याचे जड डोई ओझे 

आणले विरांनी महा परीवर्तन

स्वातंत्र भारत भूमीला द्यावा मान

प्रजासत्ताक भारताला करा भविष्य दान।।l



Rate this content
Log in