त्रिवेणी काव्य
त्रिवेणी काव्य
1 min
447
ईश्वरा हृदयात तूच रे वसतोया
काहीच मागत नाही तुला
दे भक्तीचा जागर तू मला
हृदय मी वाहिले तुला
सोडून आले गोतावळा
बेभान काटे बोचती मला
सर्वधर्माची पाहते एकनिष्ठता
कधी होईल हे विराट जग
लढा दिल्याशिवाय महासत्ता
कर्तुत्वात ईश्वर जाणा रे
भाव, दया, ठेवा हृदयात
आत्मा, ईश्वर हेच सत्य रे
अव्याहत जो चालतो संसारात
मग त्यात करावा लागतो त्याग
तेव्हा होते हृदयावरती मात