Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Meenakshi Kilawat

Others

5.0  

Meenakshi Kilawat

Others

जेष्ठ नागरिक

जेष्ठ नागरिक

1 min
183


जेष्ठ नागरिक आहे घरची शोभा

कर्तव्य करूनी सांभाळले कावा

मुलांचे आयुष्य उज्वल  करूनी

समाजात ही करती सेवा ||

दैदिप्यमान या नभांगनी

वास्तवात खेळ खेळती

कोण म्हणे तो भास खोटा

युगायुगांतरीचे नाते पाळती ||

सूर्य चंद्र अन तारका

सदा आकाशात या राहती

कार्य आपुले व्यवस्थितपणे

नित्यनेम पार लाविती ||

बंधनात अखंड सृष्टी ही

भार उचले जर,जंतू,प्राणी   

प्रत्येक श्वास मोजूनी या

देत असे प्रत्येकास क्षणोक्षणी ||

आत्मसुधारस जगण्यास

निसर्ग देतो भर भरूनी

युगायुगांतरा पासूनी जीवन

संचार करीतसे अर्क देवूनी ||

श्वासागनिक भरजरी

तोडूनी अभेद्य भिंती

पवनलहरी उल्हासूनी

रोमछिद्राला विंदती ||

विलसे युगेयुगे नाते हे

माया ममता वात्सल्याचे

प्रेम प्रीत सत्यमेव जगी

आधारस्थंब एकमेकाचे ||

अस्तित्व असे युगेयुगे

जीवन मृत्यूचे चक्र फिरे

बाळपण तरुणपण वार्धक्य

शिकविते संस्कार खरेखूरे ||



Rate this content
Log in