Swapna Sadhankar

Others

2  

Swapna Sadhankar

Others

यत्न

यत्न

1 min
13


प्रारब्ध!, किती वजनदार शब्द नी तेवढाच गहन ही. तेच नशीब म्हटलं की कर्मयोगींच्या मते पळपुटा शब्द. नशीब, नियती, दैव्य, भाग्य किंवा प्राक्तन काहीही म्हणा विधिलिखित जरी कर्मानेच कमवावे लागते तरी कधी किती कसे कर्मफळ मिळणार हे ठरवते आपले प्रारब्ध. म्हणूनच म्हणतात फळाची अपेक्षा किंवा चिंता करू नये फक्त कर्म करत राहावे. 'प्रयत्नांती परमेश्वर' हे त्रिवार सत्य जाणून अथक अविरत प्रयत्न करत राहणे हे आपल्या आटोक्यात. त्या प्रयत्नांचा हिशोब लाऊन अपेक्षित यश वेळेआधी मिळवण्याचा अट्टहास निरुपयोगी. येथे कर्मसिद्धांत किंवा विज्ञान-अध्यात्म वाद वगैरे ह्याविषयी बोलण्याचा हेतू नाही. व्यवहारात प्रयत्न आणि प्रारब्ध चं नातं समजून निराशेला सामोरे जाण्याची आजच्या काळाची नितांत निकड हा मुद्दा आहे... वारंवार अपयश पचवून शेवटपर्यंत प्रयत्नांची कास धरून ठेवणाऱ्या आशावादी माणसाचा सकारात्मक मार्ग सर्वांनाच गवसतो असं नाही. नकारात्मकतेच्या गर्तेत न फसता धडपडत वर येणं सहज नाही. कारण त्यात स्वतःच्याच सकारात्मक प्रयत्नांची जोड स्वतःला लागते..... अश्यात निराशेचा हात तात्काळ सोडून आपल्यातल्या प्रबळ गुणांना गिरवून त्यांचा आधार घेणे. 'केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे' या तत्त्वाचा अवलंब करून आपल्या ध्येयाकडे अथवा आपल्या कर्तव्याकडे एक एक पाऊल समोर टाकत राहणे. आडव्या येणाऱ्या अडचणींना धीराने सामोरे जाणे. पदरात पडणाऱ्या यशापयशाला पचवत परत मार्गस्थ होणे. वेळप्रसंगी नशिबाशी दोन हात करून त्याला स्वीकारणे. समाधानाची शिदोरी सोबत घेऊन *यत्न-प्रवास* सुरू ठेवणे......


Rate this content
Log in