Pratibha Tarabadkar

Comedy

3  

Pratibha Tarabadkar

Comedy

You are impossible

You are impossible

2 mins
178


आज बाळराजे आणि लेक येणार म्हणून आजी आजोबा भराभर आवरुन दोघांची वाट बघत सोफ्यावर बसले होते.मोठमोठ्याने गाण्याचा आवाज ऐकू येऊ लागला.कुठले तरी अगम्य भाषेतील गाणे म्हणत बाळराजे येत होते.हल्ली मराठी, हिंदी, इंग्रजी गाणी त्यांना डाऊनमार्केट वाटत असल्याने इटालियन, स्पॅनिश वगैरे गाणीच ते गुणगुणत असत.

उघड्या दारातून ते आत आले,बूट शू रॅकच्या दिशेने भिरकावून आजी आजोबांच्या मध्ये स्थानापन्न झाले.आजीचा मोबाईल घेऊन आजीचा अंगठा घेऊन स्क्रीन वर दाबल्यावर मोबाईल ऑन झाला.

'अरे आधी हातपाय धू आणि मग बस',या आईच्या सूचनेकडे सपशेल दुर्लक्ष करून बाळराजे आजीकडे वळले.'आजी हा मोबाईल बदल '.

  'कशाला?'आजीचा सावध पवित्रा!

'अगं कसला जुना पुराणा फोन आहे हा!'

  'पण चालतोय की चांगला!'आजीची सफाई

 'आत्ताच मोबाईलचं नवीन मॉडेल लॉन्च झालंय बाजारात.पिक्चर क्वालिटी चांगली आहे, कॅमेरा, साऊंड एकदम ए वन आहे.' बिझनेसमन वडिलांचे समोरच्या गि-हाईकाला पटवायचं कसब जन्मजात प्राप्त झालेल्या नातवाने आजीला convince करायला सुरुवात केली.

  'अरे मी फक्त यू ट्यूब,फेसबुक आणि व्हॉट्स अप बघते.मला काय करायचीय क्वालिटी वगैरे?'आजीने आपला मोबाईल न बदलण्याचा मनसुबा ठामपणे जाहीर केला.

  'अरे तुझी आजी काय ऐकणारी बाई आहे का?'आजोबांनी संभाषणात उडी घेतली.

  'आजोबा,हा शर्ट तुम्ही अजून किती दिवस घालणार आहात?'

 'का काय झालं या शर्टाला?'आजोबांनी लहान मुलासारखा शर्ट घट्ट पकडून ठेवला.

 'अहो मागच्या वेळेस आलो तेव्हा हाच शर्ट घातला होतात!'नातवाची स्मरणशक्ती एकदम जबरदस्त!

 'बाबा दिवाळीत घेतलेले शर्ट अजून वापरायला काढले नाहीत का?'कन्यकेने चौकशी केली.

'अगं गुढीपाडव्याचा मुहूर्त काढलाय त्यांनी शर्टाचं उद्घाटन करायला!'आजोबांना टोमणे मारायची संधी आजी अजिबात फुकट घालवत नाही.

 आता नातवाचं लक्ष आजोबांच्या सॅंडल्सकडे गेलं.

 'आजोबा, मॉल मधून तुम्हाला शूज घ्यायचे का?तिथे सेल लागलाय!'

   'Why?'आजोबांनी विचारले.

  'Why not?'नातवाने प्रतिप्रश्न केला.

'हे बघ, माझ्या कडे बूट आहेत,सॅंडल्स आहेत,चप्पल,झालंच तर जॉगिंग शूज,स्लिपर्स इतके सारे प्रकार आहेत मग मी कशाला अजून एक जोड घेऊ?

'Why?'आजोबांनी विचारले.

Why not?'नातवाने प्रतिप्रश्न केला.

'छे छे ,एक जोड खराब झाल्याशिवाय दुसरा घेणार नाही!'आजोबा ठामपणे म्हणाले.

 'Oh आजोबा आजी, you are impossible!'असे म्हणून नातू बेडरूममध्ये आजोबांच्या लॅपटॉपशी खेळायला निघून गेला.

आणि आजी आजोबा आपला

नातू आपल्याला impossible का बरं म्हणाला असेल म्हणून डोकं खाजवत बसले.



Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy