विद्यार्थी जीवन
विद्यार्थी जीवन


विद्यार्थी जीवनात शिक्षण घेत असता, शारीरिक व बौद्धिक या सवयी उच्च दर्जाच्या असायला पाहिजेत. विद्यार्थी जीवनात चांगल्या सवयींना अत्यंत महत्वाचे स्थान आहे.चांगले साहित्य वाचन करणे,योग्य कारणास्तव पैशे खर्च करणे,नेहमीच इतरांच्या मदतीसाठी धावून जाणे,जेवढे पाहिजे तेवढे आवश्यकते नुसार बोलणे,अशी विद्यार्थी पुढील आयुष्यात समाजावर चांगला प्रभाव टाकतात.आणि आपली वेगळी छाप पाडून वेगळी ओळख निर्माण करतात. ती विद्यार्थी अनावश्यक गप्पा करुन आपला अमूल्य वेळ गमवत नाही.असे विद्यार्थी त्यांनी निवडलेल्या क्षेत्रात ते हमखास यशस्वी होतात.ती विद्यार्थी सदोदित यश संपादन करतात. कोणत्याही क्षेत्रात पदार्पण केल्यास नाकाम होत नसतात.आजच्या विद्यार्थी वर्गात करिअर मध्ये चढाओढ सुरु असते.काही विद्यार्थी दुसऱ्या कुणावर खापर फोडून मोकळे होतात.कधी म्हणतात! आम्हाला कुणाचेही मार्गदर्शन मिळाले नाही.कधी फेकल्टि नाही, त्या सरांच समजत नाही.अनेक कारण देतात. त्यांच्या ठाई नकारात्मकपणा असतो.तो प्रथम दुर करायला हवा.पंरतू कसा दुर करायचा ते त्यांनीच ठरवायला पाहिजे.स्वाभिमान असावा अभिमान नको!आपल्या आत्मबोधासाठी मागेपूढे बघत बसण्यापेक्षा यशस्वितांचे मार्गदर्शन घेतले पाहिजे.आणि सकारात्मकता वाढवली पाहिजे.
'लवकर निजे, लवकर उठे, तया ज्ञान, आरोग्य, संपत्ती लाभे'अशी किती साधी सोपी म्हण समाजात रुढ आहे. पण ती कायम पुस्तका पुरतीच मर्यादित असते. या म्हणी आचरणात यायला पाहिजेत. पूर्ण मनाने पहाटे लवकर उठून अभ्यास करणे, लवकर झोपणे ,ही सद्गुणी विद्यार्थी दशेला हा सर्वोत्तंम पोषक गुणं आहे.पहाटे उठल्याने तरोताजा,उल्हास व चपळता येवून मनात चांगले विचार येत असतात. 'चांगले गुण यायला वेळ लागत असतो आणि वाईट गुण यायला घटका ही लागत नाही.'
विद्यार्थी वर्गात चांगलं,वाईटाची समज असायला पाहिजे.आपणास वाईटाचा भास नेहमी होत असतो. आपल मन वाईट मार्ग धरतांना हजार वेळा सांगत असतो. तरी आपण त्या मार्गावर अलगद पणे संचार करतो. विचार करण्याची आपली पात्रता नसते.ती पात्रता कशी येते, हे आपण समजून घ्यायला हव,ती समज आपल्यात असते.कोणत्याही संकटात सापडण्या आधी इवलासा ससा कान टवकारतो,तश्या पद्धतिने मानव जातिला ही प्रत्येक संकटाची चाहुल आधिच मिळत असते! त्याकडे दुर्लक्ष करु नये! जर आपन एक वेळ जर चूकीचा मार्ग अवलंबला तर सोडणे अतिशय अवघड असते.अर्थात!जे आपणास नाही पटत ते काम करु नये.दारु पिणाऱ्यांना ही दारुचे दुष्परिणाम माहिती असतात.पन तो मार्ग चूकीचा होता हे ही त्याला कळत असते.तसेच खोट बोलणाऱ्यांना ही माहिती असतं,की खोट बोलण्याचे काय परिणाम होतात,परंतू ती सवय एकदम सुटत नाही.
काहीं विद्यार्थ्यांना मोठेपणा दाखविण्याची सवय असते. काहींना आहे त्यापेक्षा जास्त ज्ञान दाखवण्याची सवय असते.दुसऱ्यांच्या भावनेशी खेळणे,मजाक उडवणे.आत्मप्रौढी मिरवणे अश्या अनावश्यक बाबीमुळे त्यांची प्रतिमा मलिन होत असते. जवळ बुद्धी असून सुद्धा त्याचा फारसा लाभ मिळत नाही. आणि त्यांच आयुष्य तारेवरची कसरत करता करता निघून जात असते त्या उलट आजकालचे काही विद्यार्थी प्रत्येक सुख सुविधांचा उपभोग करु पहातो.चांगले कपडे, चांगले सौंदर्य प्रसाधने,किंवा गाडीचा हट्ट,किंवा मोबाईलचा हट्ट,असे कित्येकच शौक आजच्या विद्यार्थ्यांमध्ये दिसून येतात,आणि या सर्व गोष्टींचा त्यांच्या पॉकेट मनीवर घाला येतो. आईवडिल पैसापैसा जमवून मुलांना शिक्षण शिकायला पाठवतात.गावातले शिकून झाले की बाहेरगावी शिकायला पाठवतात.त्यांना खुप अपेक्षा असतात.आपली मुले शिकत आहे.नंतर नौकरी करेल,आणि आपण सर्व सुखी होवू .पण काही आईवडिलांच दुर्दैव असत की त्यांची मुल त्यांना कधिच सुखी करत नाही.या सर्व गोष्टीची मुलांना जाणीव असायला पाहिजे. त्यालाच विद्याग्रहण करणार खरा सुसंस्कारी विद्यार्थी म्हणतात.......