Jyoti gosavi

Others

4.0  

Jyoti gosavi

Others

वेगळा महिला दिन

वेगळा महिला दिन

2 mins
155


महिला दिनाच्या निमित्ताने आता थोडं वेगळं बोलायची वेळ आलेली आहे. 

महिला दिन म्हणजे फक्त एक दिवस मजा करा, कोणती तरी संस्था ,कोणता तरी राजकीय पक्ष, तुमच्यासाठी दिवसभर कार्यक्रम ठेवणार,त्यात जा, हुंदडा, संध्याकाळी घरी या. उद्यापासून येरे माझ्या मागल्या! 

आता खरोखरी ज्या साक्षर आहेत ,सुविद्या आहेत, ज्यांना घरातून पुरुष मंडळीचा पाठिंबा आहे, किंवा बऱ्याच वेळा घरातल्या कर्ते पणाची भूमिका ती स्त्री स्वतः निभावत आहे .

पैशाला स्वायत्त आहे, स्वतःचा भरपूर पगार आहे, अशा स्त्रियांसाठी वेगळा महिला दिन राबवण्याची गरज नाही. 

उगाच एक दिवस महिला दिनाच्या संदेशाने मोबाईल भरून जाणे, वेगळे चित्र विचित्र कपडे घालणे**** हॉटेलला जाणे, खाणे पिणे, पार्टी करणे, मौज मजा करणे, म्हणजे झाला महिला दिन? 

असे नको, तर तुमच्यातीलच ज्या खरोखर साक्षर सुविद्य आणि कॅपॅबल आहेत, दुसऱ्यांची मदत करू शकतात, अशा महिलांनी आपला गट बनवून एखाद्या महिलेला मदतीचा हात द्यावा. मदतीचा हात फक्त काही पैशानेच असतो असे नाही, मग लोकांना फुकट घेण्याची सवय लागते. 

पण आपलीच कामवाली बाई असते, अजून एखादी ओळखीची असते, जी खरंच आपल्या परिस्थितीशी लढाई करत असते. तिला थोडीफार आर्थिक मदत करायला काहीच हरकत नाही. 

आता जे काहीच न करता रस्त्यावरती भीक मागतात त्यांना उचलून देऊ नका, पण महिला दिनाच्या निमित्ताने पंचवीस तीस बायकांच्या गटांनी मिळून एखाद्या बाईला आर्थिक मदत केली, तिला समस्येच्या मुळाशी जाण्यास मदत केली, नक्की काय अडचण आहे .?कशामुळे काय होते, हे पाहून, तशी कृती करावी. आणि मुख्य म्हणजे तिला मानसिक आधार द्यावा, पुढच्या वर्षापर्यंत एक जरी महिला अशी आपल्या पायावर नीट उभी राहिली, आणि आपल्या मार्गाला लागली .

तर खरा महिला दिन साजरा होईल असे मला वाटते.


Rate this content
Log in