Swapna Sadhankar

Classics

3  

Swapna Sadhankar

Classics

उर्मी

उर्मी

2 mins
363


*प्रस्तावना*

काही दिवस असतात आईच्या कुशीत शिरायचे, काही खेळत बागडत आपल्याच् विश्वात रमायचे, काही शाळेचे आणि मग कॉलेजचे, काही करियर घडवायचे तर काही स्ट्रगल करून स्वतःला सिद्ध करायचे, काही दिवस संसारात नि मुलांमध्ये जगायचे, काही जवाबदाऱ्या निभवायचे आणि काही सुवर्ण दिवस तरुणाईत झिंगायचे व प्रेमात हरवायचे. पण काही खास राखीव दिवस असतात देवाचे देणे 'मंतरलेले दिवस'. ते दिवस असतात 'मैत्रीचे', मित्रमैत्रिणीं सोबत घालवलेल्या क्षणांचे!.. अश्या क्षणांने प्रेरित केलं माझ्या लेखणीला. आणि मी आवड म्हणून कविता लिहिणारी चक्क पैरग्रैफ च्या पैरग्रैफ लिहायला लागले. कधी त्यांच्या सोबत घालवलेल्या मस्त वेळेचं वर्णन म्हणून तर कधी त्यांच्या आठवणीत हरवले म्हणून. मग त्यांच्या वाढदिवसाला त्यांना खास शुभेच्छा द्यायच्या म्हणून. आणि मग वेडच लागले मनात येणाऱ्या विचारांना शब्दात उतरवायचे... मैत्रीच्या प्रेरणेतून उदयाला आलेली माझी १० भागांची सिरीज "काही मंतरलेले दिवस" आधीच प्रकाशित केलीय कथा या विभागात आणि कविता या विभागात मराठी व हिंदी कविता. त्याला मिळालेल्या प्रेमळ प्रोत्साहनाने आता निरनिराळे विषय हाताळून स्टोरीमिरर च्या या व्यासपीठावर मी ब्लॉग्ज देखील टाकणार आहे. आशा करते की वाचकांना आवडेल.


आयुष्याच्या मध्यांनावर जिथे स्वभावात एक ठहराव येतो तिथे मागे वळून बघताना वाटतं, समृद्ध म्हणता येईल असं सगळं काही मिळालंय. फारशी धडपड करण्याची गरज नाही आता, इथून पुढचा प्रवास शांतचित्ताचा असावा. अस्वस्थ मन स्थिर असायला हवं. ह्याचीही धडपड संयमित असावी. सुखवस्तू दर्जा, आदर, मैत्री, आप्त, लाड, इत्यादींनी ह्याने समाधानी रहावं. या टप्प्यावर मनाचे सैरभैर होणे ग्राह्य नाही, ह्याने आपली चंचलता आवरून शिस्तीची मुरड घातलीच पाहिजे. की सारं काही असणं ह्याला भोवतय?... नाही! जी खोलवर आतून येणारी आर्त किंकाळी पुसटशी ऐकू येते ती नक्कीच काही सांगू पाहतेय. ऐकण्याचा प्रयत्न केला की वाटतं आतल्या आत खदखदणारा लाव्हा ज्वालामुखी बनू पाहतोय. जणू पुढच्या क्षणाला कुठल्याश्या अनामिक पोकळी चा उद्रेक होईल. ढवळणारा तप्त भावना-रस, गुदमरणारा जीव-वायू आणि दडपलेली शल्य-राख ओत प्रोत बाहेर पडून रास रचेल. भीती वाटायला लागते कि त्यासमोर जमिनीत घट्ट पाय रोऊन उभी राहण्याचा प्रयत्न करत असलेली मी उन्मळून पडेल की काय?! स्वतःला हलवून भानावर आणलं की परत तोच प्रश्न आ वासून दिसतो, 'काय कमी आहे?, अजून हवय तरी काय?!'... तात्पुरता उपाय करून झाला की काही काळ शांत व्हायला होतं. एक नमुनेदार योजना आखली जाते. खूप साऱ्या याद्या बनवल्या जातात. त्या अनुसरण्यात मन बहलावलं फुसलावलं जातं. सगळं अगदी नेटाने सुरळीत सुरू असतं. मन आपला धर्म पाळत असतो आणि आपण आपलं कर्तव्य. आयुष्य सरत असतं. नव्हे!, आयुष्यात सगळं कसं छान चाललं असतं. कित्ती सोपं आहे ना हे?... मन मन करून गोंजारले की बालहट्टी थैमान घालून चापून-चुपून बसवलेली घडी विस्कटून टाकणार. ह्याच्या खुळेपणाच्या नादी लागून अनन्य अद्भुत अभिनव जन्माला आल्याची कितीतरी उदाहरणं असली तरी नको ती अवास्तव ओढ अस्ताव्यस्त होण्याची. कशाला तो ध्यास अंतरंगात शिरून त्या उर्मी चा शोध घेण्याची?!.......



Rate this content
Log in

Similar marathi story from Classics