Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Gauri Kulkarni

Drama Inspirational Others


3  

Gauri Kulkarni

Drama Inspirational Others


टेक अ चान्स

टेक अ चान्स

3 mins 249 3 mins 249

"Take a chance because you never know how absolutely perfect something could turn out to be. "

       स्वतःच भिंतीवर चिकटवलेलं हे वाक्य सायलीच्या डोक्यात अक्षरशः धुमाकूळ घालत होतं. निमित्त होतं तिच्यासमोर उभ्या राहिलेल्या प्रश्नाचं.

     सायली, वय वर्षे 40, सुस्वभावी उच्चशिक्षित गृहिणी. गृहिणी हा तिचा स्वतःचा चॉईस. मुलं लहान असताना धावपळ करत राहिलो तर खूप काही सुटून जाईल असा तिचा समज होता. म्हणून तिनेच मी करेन एडजस्ट म्हणत चांगली सुरू असणारी नोकरी सोडून घरी राहायचं ठरवलं. त्यावेळी सगळ्यांनी तस तिला वेड्यात काढलं. पण आता काही वर्षांनी तिच्या मुलांना, घराला भेट देणाऱ्या प्रत्येकाला तिने घेतलेला निर्णय योग्य होता असंच म्हणावं लागलं.

      आता कुणी म्हणेल अस वेगळं काय केलं होतं? खूप काही नाही पण सायली आणि तिचा नवरा राजीव दोघांनी मिळून काही गोष्टी ठरवल्या होत्या . दोघांपैकी एक जण घरात असल्याने त्या गोष्टी त्यांना जरा नीट कार्यन्वित करता आल्या इतकंच. त्यांच्या घरात टीव्ही अजिबात नव्हता पण पुस्तकं मात्र भरपूर होती. मोबाईलचा वापर अनिवार्यच असल्याने तो घरात होता पण वापरण्याचा वेळ मात्र ठरवलेला होता. या आणि अशा इतर लहानसहान सवयीमुळे मुलं आपोआपच वेगळ्या पद्धतीने विचार करू लागली. अर्थातच त्याचा प्रभाव इतर क्षेत्रात दिसू लागला.

दोन्ही मुलं स्वतःच्या आवडीनिवडी ओळखून त्या दिशेने वाटचालही करू लागली होती. असो पण आपली गोष्ट सायलीची आहे . आता मुलांची जबाबदारी कमी झाल्याने सायलीकडे खूप मोकळा वेळ असे. यावेळाच काय करावं हे काही तिला सुचत नव्हतं. अशातच तिच्या घराजवळ एक नवीन कंपनी सुरू झाली. कंपनीची मालकीण म्हणजे शेजारच्याच कॉलनीत राहणारी दीप्ती होती. गृहिणी असणाऱ्या बायकांना लक्षात ठेऊनच तिने काही नवीन पद्धती सुरू केल्या होत्या. पण नवखी असल्याने तिचा थोडाफार गोंधळ उडत असे. सायली आणि तिच्या शेजारच्या सगळ्यांना तिथे येण्याचे आमंत्रण दिले होते. म्हणून सगळं महिला मंडळ आज लवकर काम आवरून दुपारी त्या छोटेखानी मॉल मध्ये पोहोचले. एकाच छताखाली बऱ्याच सोयी देण्याचा प्रयत्न केला होता. पण फक्त स्त्रियांसाठी अन् तेसुद्धा मध्यमवर्गीय आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय स्त्रियांसाठी खासकरून. परवडतील असे दर आणि बचतगट वगैरेंच्या मदतीने चालवली जाणारी दुकानं.

सायली आणि सगळ्या जणी खूपच खुश झाल्या हे सगळं पाहून. अशातच एका ठिकाणी काहीतरी खूप गोंधळ निर्माण झाला अन् सगळ्यांचं लक्ष तिकडे वेधलं. उत्सुकता म्हणून सगळ्या तिकडे वळल्या. बिल काउंटर वर गोंधळ होऊन चुकून काही झाल होतं. दीप्ती कुणाशी तरी फोनवरून येण्याबद्दल बोलत होती. पण तिथेही काहीतरी प्रॉब्लेम होत असल्याने ती जरा गडबडली होती. सायली हळूच तिच्याजवळ गेली आणि तिने मी बघू का असा विचारलं. दिप्तीला आश्चर्य वाटलं पण तिने होकार दिला. थोड्या वेळातच सायलीने बिलात झालेला घोळ सांगत काय चुकलं हेही दाखवलं आणि योग्य भाषेत काम करणाऱ्या मुलींना समजही दिली. दीप्ती हे सगळं बघत होती आणि अचानक तिने एक निर्णय घेतला.

तिने सायलीच्या समोर पूर्ण ऍडमिनिस्ट्रेशन संभाळशील का? असा प्रश्न ठेवला. त्याच प्रश्नावर विचार करता करता सायली आज गोंधळली होती.

संध्याकाळी राजीव आणि मुलं घरी आली तस तिने झालेला प्रसंग त्यांना सांगितला आणि काय करू असही विचारलं. त्यावर मुलं आणि राजीव अर्थातच उत्साहाने म्हटले की संधी मिळाली आहे तर सोडू नकोस. त्यांनी गोंधळलेल्या तिला तिनेच चिकटवलेलं वाक्य दाखवलं. तिने दिप्तीला होकार कळवला. रात्री उद्या किती आणि काय आवरत निघावं लागेल याचा विचार करतच ती झोपली.

नेहमी 5च्या ठोक्याला उठणाऱ्या तिला सकाळी मात्र उशिरा जाग आली. अस कस झालं ह्याचा विचार करत ती स्वयंपाक घरात शिरली आणि समोरच दृश्य पाहून चकित झाली. नवरा आणि मुलं सगळं आवरून नुसते तयारच नव्हते तर तिच्यासाठी नाश्ता, एक फुलांचा गुच्छ टेबलवर ठेवला होता. ती समोर दिसताच मुलं तिला येऊन बिलगली आणि बेस्ट लक म्हणाली. इथून पुढे मात्र सायलीला स्वतःला सिध्द करायचं होतं. ते अर्थातच ती करणारच होती. आपलं आवडतं वाक्य मनात घोळवतच सायलीच्या नव्या इनिंगची सुरुवात झाली .

तात्पर्य काय  तर हेच "Take a chance because you never know how absolutely perfect something could turn out to be." स्वतःला एक संधी तर देऊन बघा कोण जाणे कदाचित सुरेख अस काहीतरी निर्माण होईल .


Rate this content
Log in

More marathi story from Gauri Kulkarni

Similar marathi story from Drama