Author Sangieta Devkar

Abstract Drama Tragedy

4.0  

Author Sangieta Devkar

Abstract Drama Tragedy

थोडी सी बेवफाई

थोडी सी बेवफाई

3 mins
187


डॉक्टर,लवकर चला मॅडम ची तब्येत खराब झाली आहे.किशोर डॉ.राजन च्या घरी आला होता.किशोर राव साहेबांचा ड्राइवर होता.राजन ने पटकन आपली मेडीसिन ची बॅग घेतली आणि किशोर सोबत निघाला.

रावसाहेब शहरातील नामी प्रसिद्ध उद्योगपती.त्यांची मुलगी भक्ती आजारी होती.गेली वर्ष भर अंथरुणावर होती.तिला श्वसनाचा दुर्धर आजार होता.एक प्रकारचा कॅन्सर.डॉक्टर राजन भक्ती ची ट्रीटमेंट करत होते . भक्ती २६ वर्षाची तरुण मुलगी होती.दिसायला सुंदर पण आता आजाराने काळवंडलेली.राजन ने तिला इंजेक्शन दिले .तिचा हात हातात घेत धीर दिला.रावसाहेब आणि राजन दोघांना माहित होते की भक्ती चे खूप कमी दिवस उरले होते.

डॉक्टर आज कोणती कविता वाचून दाखवणार? तिने विचारले.

राजन रोज तिला एक कविता वाचून दाखवत असे,तिला खूप आवड होती कथा कवितांची. भक्ती ची ट्रीटमेंट करता करता राजन नकळत तिच्यात गुंतत चालला होता.भक्ती ही राजन वर प्रेम करू लागली होती.

रवींद्रनाथ टागोरांची एक कविता राजन ने वाचून दाखवली,एक प्रेम कविता होती ती.डॉक्टर,मला ही असाच जोडीदार हवा होता या कवितेत आहे तसा,माझ्या वर भरभरून प्रेम करणारा.मला जपणारा. भक्ती बोलत होती.


भक्ती,तुला बोलताना त्रास होतो ना,प्लीज बोलू नकोस.आता आराम कर राजन म्हणाला.

सांगा ना डॉक्टर, मला मिळेल का असा जोडीदार. भक्ती प्रेम भरल्या डोळ्यांनी त्याच्या कडे बघत होती.

हो मिळेल नको काळजी करू. पण त्यासाठी तू बरी हो अगोदर राजन ने समजावले तिला.

राजन घरी जायला निघाला तेव्हा नेहमी प्रमाणे भक्ती ने एक गुलाब त्याला दिला.

राजन घरी आला.हलली तो इरा शी त्याच्या बायको शी नजर मिळवून बोलत नसायचा.तिला नजर देण टाळत होता. भक्ती कडे त्याच मन ओढ घेत होते.ही गोष्ट इरा च्या ही लक्षात आली होती.

राजन भक्ती वर उपचार करत होता,त्याला माहित होते की या आजारतून ती बरी होणे कठीण आहे पण भक्ति आयुष्याच्या अशा वळणावर होती की जिथे पुढे खोल दरी होती अशा टप्प्यावर तिने राजन वर प्रेम केले होते.राजन चे नुसते नाव घेतले तरी तिला सुकून मिळत असे,तिचा त्रास थोडा तरी कमी होत असे..तिच्या डोळ्यात राजन ला तीच प्रेम दिसत होते.तो ही ओढला जात होता एका अनामिक ओढीने.

इरा ने त्याला या बद्दल एक दिवस जाब विचारला,राजन ने ही कबूल केले की त्याचं भक्ती वर प्रेम बसले आहे.

इरा खूप रडली मग तिने त्याला शपथ घातली की इथून पुढे तू भक्ति ची ट्रीटमेंट करायला जाणार नाहीस.

राजन ने वचन दिले. इकडे भक्ती रोज त्याची वाट बघत होती. पण राजन इरा च्या वचनात बद्ध होता.

थोड्या दिवसांनी किशोर पळतच राजन कडे आला,डॉकटर लवकर घरी चला,मॅडम ची तब्येत खूप बिघडली आहे.प्लीज.

पण राजन ने त्याला नकार दिला.

डॉक्टर,मॅडम ने तुमच्या नावाचा जप लावला आहे,त्या औषध ही घ्यायला तयार नाहीत.तुम्हीच एकटे आहात ,त्यांना सांभाळू शकाल.

राजन चे मन भक्ती च्या काळजी ने तडफडत होते.त्याने इरा कडे पाहिले. तिने नजरेने त्याला जा असा इशारा केला.

राजन पटकन भक्ती कडे आला.भक्ती भक्ती,तुला काही ही होणार नाही,मी आलो आहे बघ.तू बरी होणार.

भक्ती ने त्याला पाहिले त्याचा हात हातात घेतला,इतके दिवस कुठे होता डॉक्टर ? मी खूप मिस केले तुम्हाला.

राजन ने तिला इंजेक्शन दिले आणि शांत रहायला सांगितले. डॉक्टर,मला सोडून का गेला होतात तुम्ही.बघा ना माझ्या कविता तसाच बाकी आहेत ऐकायच्या अजून.आज ऐकवणार का?

हो भक्ती..राजन ने तिच्या हातावर थोपटले.

डॉक्टर,मला एक वचन द्याल

कसले वचन.?

मी जेव्हा हे जग सोडून जाईन,तेव्हा तुम्ही माझ्या जवळ असाल आणि मला ते कवितेत प्रियकर कसे आपल्या प्रियेसीच्या कपाळाचे चुंबन घेतो,तसे चुंबन मला द्याल?

हो भक्ति पण आता झोप तू शांत.राजन चे डोळे भरून आले होते.ती थोड्याच तासांची पाहुणी होती आता.

पाच दहा मिनिटे भक्ती शांत राहिली.राजन घरी जायला निघाला,तसे भक्ती चे हार्ट बिट्स अचानक वाढू लागले,तिला श्वास घेता येईना.डॉक्टर राजन... भक्ती ने आवाज दिला.

राजन तिच्या जवळच होता,तिला चेक करू लागला.त्याने भक्ती चा हात हातात घेतला,नको काळजी करू भक्ती मी आहे,मी तुला बरे करेन. भक्ती च्या चेह-यावर गोड स्मित होते.अचानक राजन ला थंडगार स्पर्श जाणवला.त्याने आपल्या हातातल्या भक्ती च्या हाता कडे पाहिले.,थंडगार पडला होता.राजन च्या डोळ्यात अश्रू दाटून आले,त्याने आपले ओठ तिच्या कपाळावर ठेवले आणि तिच्या कपाळाचे चुंबन घेतले.त्याचे अश्रू तिच्या डोक्यावर पडत राहिले.

राजन घरी जायला निघाला.डॉक्टर,हे तुम्हाला द्यायला सांगितले होते मॅडम नी.किशोर हाता मध्ये सुकलेली १५/२० गुलाबां ची फुल घेवुन उभा होता.राजन ने ते सगळे गुलाब घेतले,एक नजर त्याने भक्ति ला बघितले आणि अश्रू भरल्या नजरेने बाहेर पडला.


समाप्त.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract