Author Sangieta Devkar

Abstract Drama Inspirational

3  

Author Sangieta Devkar

Abstract Drama Inspirational

स्वीकृती

स्वीकृती

4 mins
204


टिळक स्मारक ला मोठे आर्ट एक्झिबिशन भरले होते. शिवांगी एकटीच आली होती.ती स्वतः एक ग्राफिक डिझाईनर होती आर्ट मध्ये रुची होती तिला.एका पेक्षा एक सुंदर सुंदर पेंटिंग तिथे होते. शिवांगी प्रत्येक पेंटिंग थांबून निरखून बघत होती.एका सुंदर पोट्रेट चित्रा जवळ ती थांबली.खूप सुंदर कला कृती होती ती.तिने चित्रकाराचे नाव पाहिले,मुकुल व्यास .मुकुल हे नाव पाहताच ती पुन्हा चित्र नीट पाहू लागली.तो पर्यंत कोणी तरी तिच्या खांद्या वर हात ठेवला होता, हाय शिवांगी

तिने मागे वळून पाहिले,साक्षात मुकुल तिच्या समोर उभा होता.तसाच हसरा,बोलक्या डोळ्यांचा ,कुरळे केस.तब्बल पाच वर्षांनी ती त्याला बघत होती.

व्हॉट अ प्लेझेंट सरप्राइज मुकुल..तू इथे?

हो शिवांगी मीच.कशी आहेस तू?

मी मस्त,तू कधी आला इथे, म्हणजे गेली पाच वर्ष कुठे गायब होतास.

मी मुंबई ला होतो आर्ट कॉलेज ला.आता जस्ट पुण्यात आलो,या एक्झिबिशन बद्दल समजल मग माझे पेंटिंग दिले इथे.आणि त्या निमित्ताने तू भेटली ना?

ओके..भेटू मग पुन्हा.मला काम आहे शिवांगी मुकुल ला म्हणाली.त्याने ही तिला आपला नंबर दिला आणि बाय केले. शिवांगी घरी आली.आज मुकुल भेटला म्हणून खूप खुश झाली ती .इतके दिवस जी रुखरुख मनाला


लागुन आहे ती आता कमी होइल. त्याचे ते शेवटचे शब्द आय हेट यू शिवांगी ..आज ही तिला छळत होते.तिने कॉफी बनवून घेतली.तिला तिच्या कॉलेज चे दिवस आठवले.

मुकुल आणि ती एकाच कॉलेज मध्ये होती अकरावी पासून शिवांगी ला मुकुल आवडत होता, गोरा,नाजूक कुरळे केस असणारा,हसतमुख,खेळकर आणि सतत पेंटिंग करणारा.कॉलेज च्या सगळ्या ॲक्टिविटी मध्ये भाग घेणारा , ॲन्युल डे ला नाटक असेल तर आवर्जून शिवांगी त्याची पार्टनर बनत असे.तेव्हा मग नाटकाच्या संवादा मार्फत आपल्याच मनातल्या भावना मुकुल ला सांगत असे.कधी सहेतुक त्याला स्पर्श करत असे.कधी मुद्दाम त्याचे केस विस्कटत असे,जेणे करुन तो मग चिडून तिला मारायला तो मागे धावत असे.त्याला त्रास देण्यात तिला आनंद वाटत असे .मुकुल ही तिच्याशी खूप मस्ती करत असे .दोघे ही आता बारावीत होते. शिवांगी मनोमन मुकुल वर जीव लावून बसली होती.त्याला डायरेक्ट इन डायरेक्ट तस आपल्या वागण्यातून दाखवून ही देत होती.पण मुकुल त्याच्या कडून काहीच तिला हवा तसा प्रतिसाद देत नसायचा.एकदम वेगळा,मस्त मौला होता तो.

व्हॅलेंटाईन डे जवळ आला होता,शिवांगी ने त्याला आपणच प्रपोज करायचे असे ठरवले .त्याच्या साठी गिफ्ट आणि रेड रोज तिने आणून ठेवले . व्हॅलेंटाईन डे दिवशी तिने मुकुल ला कॉलेज च्या गार्डन मध्ये बोलवले.


मुकुल तिथे आला होता, शिवांगी आपल्या हातात रेड रोज घेवून उभी होती.

शिवांगी बोल काय काम आहे? का बोलवले तू मला इथे.

मुकुल आज व्हॅलेंटाईन डे आहे,माहित आहे ना.आणि अजून काय हिंट देवू तुला.तुला खरच काही समजत नाही की समजून पण वेड्याचे सोंग घेतो आहेस.

शिवांगी,मला खरच नाही माहित आहे.

मुकुल आय रिअली लव यू .अस बोलत शिवांगी ने रेड रोज त्याच्या समोर धरला.

शिवांगी,काय हे सगळ.

मुकुल अरे माझं प्रेम आहे तुझ्यावर,तुला कधीच समजले नाही का माझ्या वागण्यातून?

नो शिवांगी.. माझं प्रेम नाही आहे तुझ्यावर आपण फक्त मित्र आहोत.

मुकुल,माझ्या वर प्रेम नाही म्हणजे मग दुसरी कोणी आवडते का तुला? तिचे डोळे भरून आले होते.

शिवांगी,तुला कस सांगू..मला मुलीं मध्ये इंटरेस्ट नाही.आय डोन्ट लाईक एनी गर्ल.


म्हणजे,मुकुल..तुला मुलां मध्ये इंटरेस्ट आहे.?

हा शिवांगी..यू नो व्हॉट आय वॉन्ट टू से.प्लीज आता मला अजून काही विचारू नकोस.इतकं बोलून मुकुल तिथून निघून गेला.


शिवांगी,सुन्न मनाने तिथे बसून राहिली.


दुसऱ्या दिवशी शिवांगी क्लास रूम मध्ये आली,तर सगळी मुलं मुली बडबडत गोंधळ करत होती काय झाले हे तिला समजले नाही ती तशीच क्लास रूम मध्ये आली आणि समोर बोर्ड कडे तिचे लक्ष गेले ..ते बघून ती चाट पडली..बोर्ड वर मोठ्या अक्षरात लिहिले होते ."मुकुल इज अ होमो.." ते वाक्य वाचून शिवांगी तिथून बाहेर आली आणि मुकुल ला शोधू लागली.खूप शोधल्या नंतर मुकुल तिला कॉलेज गेट बाहेर उभा दिसला.मुकुल अरे ..कुठे कुठे शोधले तुला..

मुकुल ने रागाने शिवांगी कडे पाहीले,आणि म्हणाला,शिवांगी आय हेट यू.

ती पुढे काही बोलणार इतक्यात मुकुल निघून गेला.

नंतर मुकुल कॉलेज ला आलाच नाही.शिवांगी ने त्याला खूप वेळ कॉल केला पण त्याने फोन घेतला नाही.थोड्या दिवसांनी तिला समजले की मुकुल हे शहर सोडून गेला आहे .शिवांगी खूप नाराज झाली,तिला त्याला हे सांगायचे होते की ते बोर्ड वरच वाक्य तिने नव्हते लिहिले.या बद्दल ती कोणा जवळ च बोलली नव्हती.तिलाच माहित नव्हते की हे कोणी केले.

आज मुकुल भेटला आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्या.शिवांगी ने दुसऱ्या दिवशी मुकुल ला कॉल केला आणि भेटायला बोलवले.

दोघे एका कॅफेत बसले होते .मुकुल बरे झाले तू आता भेटलास.मला तुला काहीतरी सांगायचे होते.

शिवांगी,मला माहित आहे तुला काय बोलायचे आहे.

मुकुल आय एम सॉरी.पण तेव्हा ते क्लास रूम मध्ये मी नव्हते लिहिले काही तुझ्या बद्दल

हो शिवांगी..मला ते नंतर समजले.यू डोन्ट से सॉरी.पण खर सांगू ते ज्यांनी कोणी लिहिले ना,ते एका अर्थी बरे झाले ग.,मी इतके दिवस माझ्या अस्तित्वा पासून दूर पळत होतो.मी वेगळा आहे,माझ्यात वेगळे गुणधर्म आहेत हे मी मान्यच करत नव्हतो,पण जेव्हा संपूर्ण वर्गात माझे सत्य बाहेर आले,तेव्हा मी ठरवले की या सत्या पासून पळायचे नाही.मी जसा आहे तसाच स्वतः ला स्वीकारायचे.आणि मी स्वीकारले ही.


मुकुल मग तू इतके वर्ष कुठे होतास आणि मला का नाही भेटलास.

शिवांगी,आर्ट कॉलेज मधुन मी पदवीधर झालो,मग आर्ट मध्येच काम करू लागलो.आज मी एक नमांकित आर्टिस्ट आहे.माझ्या कामात मी आनंदी आणि समाधानी आहे.

मुकुल ,पुन्हा एकदा मैत्री करशील का माझ्याशी.शिवांगी ने आपला हात त्याच्या पुढे केला.

येस.. डेफिनेटली हसतच मुकुल ने तिला शेक हॅण्ड केला.


(समाप्त)


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract