Swapna Sadhankar

Classics

2  

Swapna Sadhankar

Classics

स्पर्श

स्पर्श

1 min
156


का एखादीच गोष्ट इतकी महत्वाची होऊन बसावी?... कदाचित तीच प्राथमिक असावी. मनाला समजतात त्या केवळ भावना! आणि मनाचं अस्तित्व नाकारलं तरी भावनांच नाकारता येणार नाही. त्या पोहचवण्यात सारं काही अपुरे पडते तिथे उरतो तो फक्त "स्पर्श"!... याची किमया न्यारी!, सारं काही उलगडणारी. शब्दावाचून बोलणारा, प्रबळ पूरक प्रभावी संवेदक हा. फक्त खरं सांगणारा, आपल्याला आपली जाणीव करून देणारा. स्पर्शाचा सुखद अनुभव परिपूर्ण करून जातो..... जन्मजात ज्ञात असलेली एकमेव भाषा म्हणजे स्पर्श. जन्माचं उगमस्थान च ते! इतर द्ध्यानेंद्रियां पेक्षा वरचढ, नाजूक तरी वेळ आल्यास त्यांची कमी भरून काढण्यास सक्षम. सृष्टीतल्या प्रत्येक सजीवाला समजणारा स्पर्श त्याची मूलभूत भावनिक निकड म्हणता येईल. मग स्पर्शाला निरभ्र सहजता लाभावी की चाकोरीबद्ध करून त्याला निषिद्ध करावं?.......


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics