स्पर्श भाग सहावा
स्पर्श भाग सहावा
अनन्याच्या हसण्या रडण्याने घराला घरपण आलं होतं.अबोलीला दिवस कधी संपायचा ते कळायच पण नाही. सासुबाई मदतीला असल्यामुळे अबोली अनन्याला वेळ देवू शकत होती. अनन्याने छान बाळस धरल होतं. तिची कधी किरकिर नसायची.
तिला घरी आणून महिना झाला त्या दिवशी तिचा वाढदिवस केला. दिवसा मागुन दिवस जात होते. जशी जशी ती मोठी होतं होती तशा तिच्या बाललीला बघून तिघेही आनंदित होयचे.अनिकेतला पण कधी घरी येतोय आणि अनन्याला खेळवतोय अस होयचं. तिला छान छान कपडे ,खेळणी घेऊन यायचा.
बघता बघता अनन्याचा पहिल्या वर्षांचा वाढदिवस आला.दर महिन्याला तिला घरी आणलं त्या दिवशी ते वाढदिवस करायचे. पण आता तिचा पहिल्या वर्षाचा वाढदिवस तिच्या जन्मतारीख नुसार करायचा अस अनिकेतनी सांगितल.
पहिला वाढदिवस मोठा करायचा अस त्यानी ठरवल. काॅलनीतला हाॅल घेऊन छान डेकोरेशन केलं. सगळ्यांना वाढदिवसाला बोलावलं.मोठा केक कापला.मुलांना चाॅकलेट्स , रीटर्न गिफ्ट. छान थाट होता. अनन्या पण चेकाळली होती. खुश होती.
हळुहळू एक पाऊल टाकत ती चालायला लागली. घरभर फिरत बसायची. आई, आजी तिच्या मागे फिरुन दमायच्या.अनन्याला आजी रोज बोलायला शिकवायची. रोज संध्याकाळी ती अनिकेतची वाट बघायची. अनिकेत दिसला की बाबा बाबा करत ती झेप टाकून त्याच्याकडे जायची.
तिघांनाही अनन्याचा लळा लागला होता. त्यांच आयुष्यच बदलून गेलं होतं.