Achala Dharap

Inspirational

3  

Achala Dharap

Inspirational

स्पर्श - भाग नववा

स्पर्श - भाग नववा

2 mins
128


'आसावरी, सांग ना .माझ्या आई बाबां बद्दल काय कळलय?'

'जाऊ दे ग! चल काही नाही' आसावरी म्हणाली.

'मला कळलच पाहिजे आई बाबां बद्दल. ' अनन्याने हट्टच धरला. 

आसावरी म्हणाली ,'अग माझ्या आईची मैत्रीण आहे ना तिने सांगितल की तुला तुझ्या आईबाबांनी दत्तक घेतलय.' 

अनन्याला ऐकून धक्काच बसला. ती रडायला लागली. 

आसावरी म्हणाली,' अग पण तुझे आईबाबा तुझ्यावर किती प्रेम करतात. काळजी घेतात. रडू नकोस ना. चल आता घरी जाऊ या.'

अनन्या निघाली.पण तिच लक्षच नव्हतं. ती वाटेत एका बागेत थांबली.तिथे बाकावर बसून ती रडत होती. मनात ना ना विचार थैमान

घालत होते. 

माझे आईवडील कोण असतील?

 मी त्यांना का नकोशी झाली असेन?

 ह्या आईबाबांनी मला इतके दिवस का सांगितल नाही?

अनन्याचा फोन सारखा वाजत होता.पण विचारांच्या तंद्रीत तिचे फोनकडे लक्षच नव्हते. 

घरी अबोली काळजी करत बसली होती. शाळा सुटून दोन तास झाले तरी अनन्या घरी आली नव्हती. फोन पण उचलत नव्हती. अबोलीने अनिकेतला पण फोन करुन सांगितल. अनिकेतने पण अनन्याला फोन केले ;पण ती फोन उचलतच नव्हती.

काळोख पडायला लागल्याच अनन्याला जाणवलं. तिचे फोन कडे लक्ष गेलं. आई बाबांचे वीस पंचवीस मिस्ड काॅल होते. 

आता घरी जायला हवं. अस म्हणत अनन्या तिथुन निघाली. घरी पोचली तर आईबाबा काळजी करत बसले होते. तिच्या चेहर्‍यावरून ती रडलेय हे दिसत होतं. 

अबोलीने तिला पाणी दिलं आणि विचारल ,' बाळा काय झालं? इतका वेळ कुठे होतीस? फोन का उचलला नाहीस?'

काहीही न बोलता अनन्या तिच्या बेडरूम मधे गेली आणि दार बंद करुन बसली.

अबोलीला आणि अनिकेतला काही समजेनाच. दोघही दार ठोकून अनन्याला सांगत होते ,'अग , दार उघड.काय झालय ते सांग. काही बोलली नाहीस तर आम्हाला कस कळणार ?'


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational