Achala Dharap

Others

3  

Achala Dharap

Others

स्पर्श भाग दहावा

स्पर्श भाग दहावा

2 mins
193


   अनन्या तिच्या खोलीत रडत बसली होती. तितक्यात तिच लक्ष आजीच्या फोटोकडे गेलं आणि आजी सारखी सांगायची ते आठवल,'आईबाबांना दुखवु नको. खूप प्रेम करतात ते तुझ्यावर.'

मग ती भानावर आली. विचार करत असताना तिला पायलची आठवण आली. पायलच्या आईला कस आयुष्य काढायला लागतय. आपल्याला आश्रमात कोणीतरी पोचवल आणि दत्तक घेतलं म्हणून एवढे चांगले दिवस दिसतात. नाहीतर... नाहीतर कदाचित पायलच्या आईसारखी वेळ आपल्यावर आली असती... छे...फार भयंकर आहे ते आयुष्य. एकदम तिला ह्याची जाणीव झाली.

  अनन्या दार उघडत नाही म्हणून अबोलीची अवस्था कठीण झाली होती. रडून रडून तिचे डोळे सुजले होते. अनिकेतला पण एकिकडे अबोलीला सांभाळायच आणि अनन्या दार उघडत नाही म्हणून काळजी वाटत होती. तो पण बेचैन झाला होता.

  तितक्यात अनन्या दार उघडून बाहेर आली.अबोलीच्या गळ्यात पडून रडू लागली.,'आई , बाबा साॅरी. माझ्यामुळे आज तुम्हाला त्रास झाला. पण काय करु अचानक मला आसावरी कडून कळल की मी तुमची मुलगी नाही. मला तुम्ही दत्तक घेतलतं. '

अबोली आणि अनिकेत एकमेकांकडे बघतच बसले. काय बोलावे पटकन त्यांना कळतच नव्हतं. मग अनिकेत म्हणाला ,' हो , आम्ही तुला दत्तक घेतलय. पण किती प्रेम करतो ग तुझ्यावर. तू आमच सर्वस्व आहेस! तुला अस कधी जाणवल का की तू आमची दत्तक मुलगी आहेस.'

' नाही रे बाबा. खरच तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करता. पण मनात आलं की माझ्या आईबाबांना मी का नकोशी झाले ? तुम्ही पण इतके दिवस का सांगितल नाहीत? '

' अग, योग्य वेळ आल्यावर सांगणारच होतो. आम्ही विचार केला तुझी दहावी झाली की सांगू. शुभांगी मावशीचा शुभम पण त्याच आश्रमातुन दत्तक घेतलाय. त्याला पण दहावी झाल्यावर मावशीने सांगितल. पण तो असा रागावला नाही. समजुतदार पणे वागला.' अबोली म्हणाली.

'अय्या हो! ' अनन्या म्हणाली. आपल्या सारखच समदुःखी आहे तो. नक्कीच उदया त्याला भेटते आणि बोलते त्याच्याशी. अस अनन्याने मनात ठरवल. आता ती शांत झाली होती.

   अबोलीने तिच्या आवडीचा गोड शिरा केला आणि अनिकेतने जाऊन तिच्यासाठी आईसक्रीम आणलं.


Rate this content
Log in