Achala Dharap

Inspirational

3  

Achala Dharap

Inspirational

स्पर्श भाग अकरावा

स्पर्श भाग अकरावा

2 mins
216


स्पर्श 

  भाग ११


  अबोलीने झालेला सगळा प्रकार फोन करुन शुभांगीला सांगितला. अनन्या बहुतेक उदया तुझ्याकडे येईल अस सांगितल. 

   दुसर्‍या दिवशी अनन्या शाळा सुटल्यावर शुभांगी मावशीकडे गेली. शुभम पण घरीच होता.

शुभांगीने आल्यावर तिला विचारल, 'काय आईबाबांवरचा राग गेला का?'

'मावशी ,चुकलच ग माझ .अस त्यांच्यावर रागवायला नको होतं. मला अचानक कळल्यामुळे धक्का बसला होता. '

' अनन्या ,मला आईबाबांनी दहावी झाल्यावर सांगितल. तस तुला पण आम्ही सगळे मिळून सांगणार होतो. अग पण विचार कर की कित्येक मुलांना दोन वेळच पोटभर खायला मिळत नाही. काही मुलं भीक पण मागतात. पण आपण किती ग नशिबवान ! आपले खरे आईवडील नसुन कित्ती प्रेम करतात. हौस करतात. मी तर त्यांचा ॠणी आहे.'

शुभमने अनन्याला समजवले.

अनन्याला पण तिची चुक कळलं. शुभमशी बोलून ती पण मोकळी झाली. मग ती शुभमला म्हणाली ,'ए, आपण त्या आश्रमात जाऊन बघून येऊया ना. तिथे असताना मुलं कशी असतात. आपल्याला ज्यांच्यामुळे हे आईबाबा, एवढ छान आयुष्य उपभोगायला मिळतय तिथे भेट देऊन येवू या .' 

 शुभांगीला पटल. रविवारी आश्रमात जायच ठरलं.

अनन्या खुशीत घरी आली. आल्यावर आईला मिठी मारुन परत एकदा साॅरी म्हटल.

   रविवारी अनन्या, शुभम आणि दोघांचे आईबाबा असे सगळे आश्रमात गेले. अनन्याने सगळं तिथल जाणून घेतलं. ऐकून तिचे डोळे भरुन आले. तिथली अपंग , मंदबुध्दीची मुले बघून खूप वाईट वाटलं. त्यांच्यातल्या व्यंगांमुळे कोणी त्यांना दत्तक घेतल नव्हतं. मग अनन्याने ठरवल की महिन्यातुन एकदा या मुलांना येऊन भेटायचं. त्यांना आनंद द्यायचा. नोकरी लागल्यावर या आश्रमासाठी दर महिन्याला काहीतरी मदत द्यायची अस तिने ठरवल.  

  अनन्याचा आता दहावीचा अभ्यासक्रम चालू होणार होता. तिला पण बाबासारख आय.टी. इंजिनियर होवून छान नोकरी करायची होती. त्या दृष्टीने तिनी अभ्यासाला सुरवात केली.

अनन्याने छान अभ्यास करून छान मार्क मिळवले आणि अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला.अनन्याने बाबांना विचारल ,"बाबा पायलच्या शिक्षणाचा खर्च तू करशील का? तिला बारावी झाल्यावर नर्सिंगचा कोर्स करुन स्वतःच्या पायावर उभ रहायचय. "

अनिकेतने कबूल केले. 

   शुभमची बारावी होवून त्याने आय. टी. इंजिनिअरिंगला अ‍ॅडमिशन घेतली. अनन्याला पण काही लागल तर ती शुभमची मदत घ्यायची. ते दोघे त्या आश्रमात जायचे.तिथल्या दत्तक घेतलेल्या मुलांच त्यांनी गेटटुगेदर केलं आणि एक वाॅटस् अॅप गृप करुन ते त्यांचे अनुभव सांगू लागले. एक मेकांना उपयोगी पडू लागले. 

  शुभम इंजिनियर होवून बंगलोरला नोकरीला लागला. त्याच्या बाबांची नोकरी चालू होती म्हणून त्याचे आईबाबा पुण्यातच होते.

  अनन्याचा पण इंजिनियरींगचा अभ्यास चालू होता.पायलने बारावी झाल्यावर नर्सिंग कोर्सला प्रवेश घेतला.तिची प्रगती चांगली होती. दोन वर्षांनी तिला एका हाॅस्पिटलला नोकरी लागली. बघता बघता अनन्या पण इंजिनियर होवून पुण्यात नोकरीला लागली. आता स्वतः नोकरीला लागल्याचा ,आपण कमवायला लागल्याच तिला खूप समाधान वाटलं. आता पैसे साठवून आईबाबांच्या म्हातारपणासाठी सोय करुन ठेवायची अस तिनी ठरवल.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational