The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

Ashutosh Purohit

Inspirational

3  

Ashutosh Purohit

Inspirational

* शुभमंगल (तरीही ) सावधान !! *

* शुभमंगल (तरीही ) सावधान !! *

2 mins
16.4K


 

तो: लोक लग्न का करतात यार... किती अशाश्वत system आहे ही..! हो खरंच अशाश्वत आहे. सुरुवातीला एखाद्या मुलीच्या आपण प्रेमात पडतो. तिचं सगळं आवडत असतं तेव्हा. तिचं हसणं, बोलणं, बघणं. सगळ्यासगळ्याचं अप्रूप वाटतं तेव्हा. एका वेगळ्याच सुंदर जगात जगत असतो आपण. ती परी असते आपली. सतत आतून ओढले जात असतो आपण तिच्याकडे. तिचं "आपलं" असणंच खूप खूप भुलवतं आपल्याला. तिच्याशी खूप काही बोलावसं वाटतं. मनातलं सगळं सांगावसं वाटतं. असे सुखात, आनंदात, अनामिक ओढीमधे दिवस चाललेले असताना त्या दोघांचं लग्न होतं. पहिली काही वर्षं त्याच भावना अगदी ओसंडून वाहत असतात. पण नंतर....?

 ती: नंतर predictions सुरू होतात. Expectations खूप वाढतात एकमेकांद्दलच्या. इतक्या; की त्यालाही त्याचं स्वतःचं असं life असूच शकतं हे विसरूनच जातो आपण. आपण बनवलेल्या आराखड्यात समोरची मूर्ती बसविण्याचा आटापिटा करतो आपण. मग समोरचा माणूस तसं वागत नाही. तोही माणूसच असतो ना कारण शेवटी! त्यालाही त्याचं स्वतःचं असं जग असतंच. तोही स्वतंत्र असतोच की!

 समोरचा तसं वागला नाही,  एकदा, दोनदा, अनेकदा, की मग मात्र आपला कडेलोट होतो. बोलत नाही आपण काहीच, पण predictions आणि चुकीची interpretations करत राहतो सतत आपल्याच आत. आणि काही गणितं पक्की करून टाकतो मनात.

 तो: आणि मग हे सगळं साचलेलं, एखाद्या दिवशी, एखाद्या कृतीतून, किंवा आपल्या बोलण्यातल्या एखाद्या वाक्यातून बिंदूरूपात बाहेर पडतं. मग आपण असं बोललोय, वागलोय म्हटल्यावर, समोरचा, त्याची आपल्याबद्दलची interpretations घट्ट करायला लागतो. Ridgid होतात हळूहळू ही मतं. सरावाने, पुनःप्रत्ययाने; आणि म्हणून ही लग्न होऊन 15-20 वर्षं झालेली लोकं, एकमेकांच्या डोळ्यांत बघून निखळ हसू शकत नाहीत. एकमेकांशी मोकळेपणानी बोलू शकत नाहीत. "माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे" असं ते सांगत नाहीत एकमेकांना. सांगूच शकत नाहीत ते! "त्यात काय सांगायचं? ते तर माहितीचे ना!" अशी केविलवाणी explanations असतात यांची वर! सरळ सांगा ना, तिचा हात हातात घेऊन तिच्या डोळ्यांत पहिल्यावर, तिच्याबद्दलची सगळीच interpretations, मतं, सगळं जुनं जुनं, सतत आठवत राहतं म्हणून!

 ती: हेच मिळवायचंय का आपल्याला आयुष्याच्या शेवटी जाऊन?

 तो: हेच होणार असेल तर मग लग्न कशासाठी करतात लोकं? फक्त वंशवृद्धीसाठी?

 ती: भजं झालंय माझ्या डोक्याचं आता. आपलं लग्न झालं नाहीये ते एक बरंय बाबा.

 तो: हो ना. सतत एकमेकांना judge करायचं, एकमेकांची अति-काळजी करायची. समोरच्याला त्याच्या जागी स्वतंत्र ठेवून नात्याचा healthy विचार करूच शकत नाहीत का ही लोकं?

 शेवटी विचार करून करून ती दमते. तिच्यातले त्राण कमी होतात.

 तो तिला बंद करून वहीत ठेवतो. ती शांतपणे वहीत निजते.

 तोही गादीला पाठ टेकवतो.

 दोघेही आपापल्या जागी स्वतंत्र. तरीही एका धाग्याने बांधलेले.

 लेखणी आणि लेखकही!

 त्याच्या मनात चटकन विचार येतो,

 लग्नानंतर नवरा बायकोही असेच राहिले तर?

 आपापल्या ठिकाणी मुक्त. तरीही एका रुपेरी धाग्याने जोडलेले.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational