Author Sangieta Devkar

Abstract Horror Thriller

2.1  

Author Sangieta Devkar

Abstract Horror Thriller

शु.... कोणीतरी आहे तिथे

शु.... कोणीतरी आहे तिथे

6 mins
195


रजनी घर साफ करून सगळ सामान लावून दमली होती. तिला बेडवर पडल्या पडल्या झोप लागली. नवीन घर नवीन जागा तिला वाटले आज काही झोप येणार नाही पन गाढ़ झोपली ती. अचानक मध्यरात्रि तिला नळ सोडल्याचा आवाज आला. बराच वेळ पाण्याचा आवाज येत होता. तिने बाजूला बघितले आकाश तर झोपला होता मग बाथरूम मध्ये कोण ? या विचारानेच तिला कापरे भरले. अहो अहो उठा लवकर तिने आकाश ला हलवले. काय रजनी का उठवतेस मला सकाळ झाली का? त्याने झोपेतच विचारले. अहो बाथरूम मधला नळ चालू आहे . मग जा आणि बंद कर रजनी. मी नळ आठवणीने बंद केला होता मग कसा चालू होईल आपोआप. मला भीती वाटते . मग आकाश च उठला आणि बाथरुम कड़े गेला पण तिथे तर नळ बंदच होता. रजनी काही नळ वैगेरे चालू नव्हता तुला भास झाला असेल. मग रजनी पुन्हा झोपी गेली. आकाश बदली होऊन या गावी आला होता. तीन रूम चे घर रेंट ने घेतले होते. गाव तसे लहानच होते तालुका होता तो. दिवसभर आकाश कामावर जात असे. तो वन अधिकारी होता. रजनी दिवसभर एकटी असे. आजूबाजूला शेजारी होते पन अजुन रजनी ची कोनाशी ओळख झाली नव्हती. कालच ते राहायला आले होते. आज रात्री ही काही आवाज येतो का याचा रजनी ने कानोसा घेतला पन तस काही नाही झाले मग रजनी निवांत झाली. थोड्या दिवसांनी पुन्हा मध्यरात्री बाळाचा रडन्याचा आवाज रजनी ला ऐकू आला. रजनी जागी झाली. ती लक्ष देवून तो आवाज ऐकू लागली. बाळ रडत होते मग अचानक एका बाई चा आवाज आला बाळा रडु नको भूक लागली का माझ्या राजाला. तरी ते बाळ रडत होते मग ती बाई अंगाई म्हणू लागली. रजनी ला आता स्पष्ट ऐकू येत होते. तिने घाबरून आकाश ला उठवले. रजनी तुला भास होत असेल झोप गप्प . नाही ओ खरच आवाज येतो आहे. आता ती बाई गात नव्हती आणि बाळ पण शांत झाले होते. आकाश उठला बोलला कुठे आवाज येतो सांग. अहो आता पर्यंत येत होता. हो का मग मला का नाही आला तुला एकटी ला फ़क्त आवाज ऐकू येतात रजनी . झोप मला कामावर जायचे असते. मग रजनी भीत भीत च झोपी गेली. सकाळी आकाश रजनी ला म्हणाला, तू ते टी व्ही वर नको त्या सिरीयल्स बघत बसु नकोस त्यामुळे तुला भास होतात. मग दिवसभर रजनी कामात मन रमवत राहिली. दुपारी एक बाई तिच्या कड़े आली. ताई नवीन आला का गावात ? हो बदली झाली आमची इकडे म्हणून. तुम्हाला वर कामाला बाई लावायची असल तर मी करते काम . त्या समोरच्या बंगलयात येते मी. नाही ओ आम्ही दोघच असतो घरी काम अस नसत काही. मीच करते सगळी काम आणि वेळ पण जातो माझा. बर ताई काय काम असल तर मला आवाज द्या मी तुमच्या इथनच जाते . बर रजनी म्हणाली. ती बाई निघुन गेली. आज अमावस्या होती . ती बाई रजनी कड़े आली ताईं हाय का घरात तिने रजनी ला आवाज दिला. रजनी बाहेर आली. ताई आज अमावस हाय हे घ्या लिम्बु मिर्ची घराला बांधा नजर लागत नाय. नको ग माझ्या मिस्टरांना नाही पटत असल काही. ताई अव बापयाना काय समजत नाय. तुझ नाव काय ग रजनी ने विचारले. शालू नाव माझ . लग्न झालय तुझ. व्हय नवरा मजूर हाय आन मी घरकाम करते. शालू या घरात अगोदर कोण राहत होत. एक नवरा बायको आणि लहान लेकरू होत बघा त्यांना. वरिस भर राहिली असतिल मग अचानक एक दिस ती बाई आणि बाळाची मयत झाली. हे ऐकून रजनी घाबरून गेली. किती दिवस झाले ग हे घर बंद होत शालू. सा महीन झाल असल बंद होत घर मग तुम्ही आला राहायला. म्हणून म्या बघायला आली की नवीन कोन बीराड आल. शालू गेली पन रजनी च्या डोक्यातुन ती बाई आणि बाळ काही केल्या जात नव्हते. आज रात्री ही रजनी आवाजाने जागी झाली किचनमध्ये कोणीतरी आहे असं तिला वाटत होते आता परत आकाश ला उठवले तर तो चिडणार म्हणून तीच उठून किचन कडे जाऊ लागली. भीत भीत ती जाऊ लागली तिने किचन क्या बाहेरुनच आत बघितले एक बाई ओटया जवळ पाठमोरी उभी होती. रजनी जाम घाबरली.तशीच ती माघारी आली आणि तिने आकाश ला उठवले काय ग का घाबरली आहेस इतकी अहो ते किचन मध्ये एक बाई आहे . वेड लागले आहे का तुला रजनी चल बघू म्हणत तो तिला किचन कड़े घेवून आला. तर तिथे कोणीच नव्हते. अहो मी आता थोड्या वेळी बघितले बाई होती . रजनी तुला भास होत आहे इथे कोणीच नाही.दुसऱ्या दिवशी रजनी शालू ची वाट बघत होती तिला विचारायचे होते की या घरात राहनारी बाई कशी मेली. शालू आज रजनी ला दिसलीच नाही. आता रोज रात्री रजनी ला कसले कसले आवाज ऐकू येत राहीले तिला आता तिथे रहाणे नको नको झाले ती आकाश ला बोलली पण की दूसरी कड़े घर बघू पण तुझा केवळ भास आहे अस तो म्हणायचा. रजनी शालू कधी येते याची वाट बघत होती . लांबुन तिला शालू येताना दिसली तसे रजनी ने तिला आवाज दिला. शालू थांब बोला ताई काय काम? मला सांग या घरात राहनारी बाई कशी मेली. ताई हे मी तुम्हाला पहिल्या दिवशीच सांगणार होते पण तुमचा विश्वास बसला नसता म्हणून नाय बोलले. सांग आता रजनी म्हणाली. ताई त्या बाई चा नवरा तिला लैई त्रास देत होता. मारायचा पण तिला . तिला वर्षाच बाळ पण होत. त्या माणसान बाहिर एक बाई ठेवली होती अस लोक म्हणत होती म्हणून त्यो बायको ला घरातून निघुन जा म्हणत होता. बायकोला त्याच हे प्रताप माहिती हूत म्हणुन ती घर सोडून जात नव्हती मग हा तिला बेदम मारायचा एक दिवस सकाळी ती बाई आणि तीच बाळ उठलेच नाहीत झोपेतच ते दोघ गेली होती पण गाव वाले बोलतात की त्यांनच त्यांना ठार मारले असेल त्या बाई चा आत्मा या घरात फिरत असतो म्हण. तुम्हाला काय बाय आवाज रात च्या टायमाला ऐकू येतात का? हो शालू मला आवाज येतो. ती बाई पण मला अमावस्या ला दिसली होती. ताई सांभाळुन रहा नाहीतर घर बदला तुम्ही बाधित हाय हे घर. अस बोलून शालू गेली. आता रजनी पुरती घाबरली. संध्याकाळी तिने आकाश ला हे सगळ सांगितले. रजनी कोण कुठली बाई तुला काही ही सांगते आणि तू विश्वास ठेवलास? अस आत्मा वैगेरे काही नसते नको लक्ष देवू तू. नाही ओ मला आवाज पण ऐकू येतात ना? आपण हे घर बदलू. अजुन महीना पण नाही झाला इथे येऊन रजनी. मला ख़ुप भीती वाटते पण . रजनी नको काळजी करु आकाश ने तिला समजावले. रात्री पुन्हा रजनी ला आवाज आला ते बाळ हसत होत बोबडे बोलत होत आणि ती बाई ही बाळा सोबत बोलत होती. रजनी उठली आणि बघू लागली किचन मधुनच आवाज येत होता. ती किचन कड़े गेली आणि पाहते तर ती बाई बाळाला मांडी वर घेवून खेळवत होती. रजनी ला घाम फुटला. ती थाम्बली हे ख़र आहे की खोट बघण्या साठी. ती बाई बाळा सोबत मग्न होती. कोण आहेस तू काय पाहिजे तुला रजनी ने विचारले तसे त्या बाई ने मान वर करून बघितले रजनी ने बघितले त्या बाई चे डोळे लाल भड़क दिसत होते कपाळावर मोठ लाल कुंकु केस सोडलेले आणि दात सुळया सारखे ती बाई मोठ्याने हसत म्हणाली मी कोन नाही माहित तुला आणि अजुन हासु लागली. रजनी इकडे कधीच बेशुद्ध होऊन पडली होती. सकाळी आकाश ने तिला उठवले रजनी इथे का अशी झोपली होतीस ?तसे रजनी घाबरत उठली आणि रात्री काय घडले ते त्याला सांगितले. रजनी ला ख़ुप ताप आला होता. अहो आता मी या घरात एक मिनिट पन नाही राहणार . आकाश म्हणाला , मी काल गावात चौकशी केली खरच या घरात बाई आणि तिचे बाळ मरण पावले होते. आपण आजच हे घर सोडून आपल्या गावी जायचे आहे .

(समाप्त)


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract