श्रावण मास
श्रावण मास


आला श्रावण श्रावण
आल्या पावसाच्या सरी
वसुंधरा होते ओलीचिंब
हिरवा शालूजसा भूमीवरी....
श्रावण मास म्हणजे सणांचा महिना.हा महिना सणांचा राजा असे असतात. या महिन्यात सणांचीरेलचेल अन गोडाचे जेवण वा!मज्जाच नुसती.
श्रावणात पहिल्याच दिवशी जिवती पूजन करतात.यानेच सुरूवात होते.दर शुक्रवारी हळदी कुंकू कार्यक्रम असतो.फुटाणे आणि दुधाचा नैवैद्य दाखवला जातो.
दर मंगळवारी नव्या नवरीची "मंगळागौर" साजरा करतात.मस्त खेळाची मेजवानी असते.रातजागरण होते.फलाहार होतो.
नंतर नागपंचमी येते. नागदेवतेच्या पूजेचा मान. नाग हा शेतकर्याला मदत करतो. म्हणून सर्व सुवासिनी मुली सातारा शहराकडे नागदेवतेचा उपवास (भावाचा) करतात.
सुवासिनी वारूळाची पूजा करतात.
नंतर येते पौर्णिमा..राखीपौर्णिमा या दिवशी बहीण भावाला राखी बांधते. भाऊ बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घेतो.
समुद्रकिनारी राहणारे कोळी बांधव समुद्राला नारळ वाहतात.म्हणजे समुद्राला शांत करतात.
हा राखीचा सण गोकुळअष्टमीपर्यंत चालतो.कारण प्रत्येक भाऊ बहीण यांनाराखीपौर्णिमेला वेळ मिळेलच असे नाही.
गोकुळाष्टमी कृष्ण जन्म साजरा करतात. नंतर दहीहंडी या परंपरेने गोपाळकाला साजरा होतो.
दर श्रावणी सोमवारी वेगळ्या पदार्थाची शिवामूठ असते.काही सुवासिनी ,मुली कडक व्रत ठेवतात.
यातील श्रावणात येणारा एक राष्र्टीय सण आहे स्वातंत्र्यदिन हा होय,या दिनी झेंडावंदन होते.समूहगीतांचे गायन होते.
बैलपोळा हा सण या महिन्यातील शेवटचा सण.शेतकरी आपल्याला अन्नधान्य पिकवण्यासाठी मदतीला येणारे बैल ,यांची मनोभावे पूजा करतात.त्यांना सजवतात,पुरणपोळी खायला देतात.एक दिवस त्यांचे लाड करून वर्षभर केलेल्या कष्टाच्या ऋण फेडण्याचा प्रयत्न करतात.
आजकाल शहरी भागात बैलांची मातीची प्रतिकृती करून त्यांचे पूजन केले जाते.
"शिंगे रंगविली
बाशिंगे बांधली ऐनेदार"
ही कविता मला होती. आज स्मरण झाले.
शेवटी इतकेच म्हणते ...
श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहिकडे....
पावसाच्या सरींनी वसुंधरा सजते.हिरवा शालू नेसते. धरणी फुलते.निसर्ग सौंदर्य पाहून मन भरते.