AnjalI Butley

Children Stories Drama Inspirational

4.0  

AnjalI Butley

Children Stories Drama Inspirational

शांतता... वाचन चालु आहे!!

शांतता... वाचन चालु आहे!!

3 mins
128


घरी बाबांमुळे पुस्तकांच्या गराड्यात लहानाचे मोठे झाले! खेळायला कागदाचा तुकडा नसेल तर आज खेळलो असे वाटतच नसे! वाचता येत नव्हते तरी पुस्त हातात.. उलटे पकडून, पुस्तक वाचयाचा अभिनय न कळण्याच्या वयातच सुरु झाला! पुस्तकातील चित्र पाहुन उगाच मोठ्याने काही तरी वाचत रहाणे हा छंदच लागला!

शाळेत पुस्तक मला जुनीच मिळायची कारण साध मोठ्या भावा बहिणीने वापरलेले, पुर्ण फाटेपर्यंत तेच पुस्तके वापरायचे हा अलिखित नियम होता आमच्या x generation चा! अयासक्रम बदलत नाही तो पर्यंत नविन पुस्तके नाही.. 

ती पुस्तके आधीच वाचलेली, कधी चोरून तर कधी घरी कोणी आल्यावर सोप्यावर पडलेली कोणतेही पुस्तक हाती घेत वाचत रहायचे, म्हणजे पाहुण्यांशी बोलणे टाळता यायचे! 

एकदा गंमतीने बहिणीच्या पुस्तकातील एका कवितेच्या अक्षरांवर वेल्यांट्या देत आपली कला कुसर दाखवली, नेमके दुसर्या दिवशी तीला तीच्या बाईंनी वर्गात तीच कविता वाचायला लावली, ती या वेल्यांट्या वाली कविता वाचत होती, व वर्गात सर्वांचा हशाचे फवारे उडत होते... सगळे त्या वेलांटीवाल्या कवितेचे विडंबन हसत ऐकत होते. तीला नंतर कळले आपल्या हातातल्या पुस्तकातील कविता ओरिजन नाही?

बाईंनी तीला तीचे पुस्तक दे बर मला बघायला करत मागितले, त्यांनी पुस्तकातली पाने मागे पुढे केली व त्यातील कलाकुसरी बघून यांच्या गालावर हसू उमटले!

तिला याचे स्मित हास्य काही कळले नाही. मग बाईंनी तीला यांच्या जवळचे पुस्तक तीच्या हाती दिले, म्हणाल्या आता वाच ही कविता... 

कविता वाचतांना ती ही कविता नाही जी मी थोड्यावेळा पुर्वी वाचली होती. पण सारखीच आहे का?.. पण हे कसे झाले?

जास्त वेळ लागला नाही तीला हे कोणी केले असेल हे ओळखायला... 

शाळेतून घरी आल्यावर नेहमीप्रणानेच संयाकाळची प्रार्थना, तुळशीजवळ दिवा लाऊन आम्ही अभ्यासाला बसलो. माझी नेहमी प्रमाणेच टंगळ मंगळ चालू होती, अभ्यासाचा मला जाम कंटाळा, पण पुस्तके वाचायला आवडायची, आई स्वयंपाक करत मधूनच एक चक्कर मारून गेली, आम्ही काय करतो आहे हे बघायला.. 

तसे ती करत असे..धाक होता तीचा आम्हाला!

माझी टंगळमंगळ बघून बहिणीने हे घे ही कविता वाच करत मला मीच केल्या कलाकुसरीवाली कविता समोर दिली... तीच्या चेहर्यावरचे हावभाव बदलत गेले ते बघून कळले आज काही खरे नाही... तोपर्यंत तीने आईला, बांबांनापण हाक मारली या या, बाली आपल्याला एक छान कविता वाचून दाखवणार आहे! 

मी पण काही झालेच नाही हा अभिनय करत कविता नीट वाचत होती, ओरिजनल जी होती ती, मी केलेली कलाकुसर वगळून, कारण कुठल्या वेल्यांट्या दिल्या होत्या त्या मला माहित होत्या... 

मग तीने वैल्यांट्या सकट तीच कविता वाचली आणि घरात एकच हशा पसरला... हे हे असेच आज माझ्या सोबत आज वर्गात घडले हीच्यामुळे, परत माझ्या पुस्तकांना हात लावायचा नाही, परत भांडण, लुटूपुटीची मारामारी नको म्हणून मीपण मोठ्या दिलदारपणाने, नाही लावणार हात करत, आई भूक लागली करत स्वयंपाक घरात आईला मदत करायला गेले.

मला माझ्या इयत्ता पाठ्यपुस्तके वाचण्याचा भारी कंटाळा असायचा!

परीक्षा जवळ आली की मी घरावर कौलांवरबसून दुसरीच पुस्तके वाचत बसायची!

घर बैठे कौलारू होते, आजूबाजूला छान झाडे होती व झाडाचा आधारघेत छतावर जाऊन बसता तेत होते! छान शांतता असायची! शांतता... वाचन चालु आहे!

वाचन संकृती सुटली नाही मोठे झाल्यावर पण ती घराच्या कौलारू छतावर बसून शांततेत पक्षी, झाडे यांच्या सानिध्यात केलेले वाचन सुटले! आता परत कौलारू छतावर बसून वाचन करने स्वप्नवत वाटतय!

पुढे नविन पुस्तके मिळत गेली अभ्यास करायला, त्या नविन पुस्तकावर आपले नाव लिहितांना खूप आनंद व्हायचा, आवडलेल्या ओळी खाली पट्टीच्या साह्याने, पेन, पेन्सिलने रेघा मारायच्या, बुक मार्क म्हणून मोरपिस पण ठेवले होते!

सगळीच पुस्तके विकत घेता येणारी नाही कारण किंमत, मग ती कॉलेजच्या लॅयब्ररीत बसून वाचने, नोटस् काढणे चालू झाले, 

उच्च शिक्षण घेतांना मोठी लॅयब्ररी, वातानुकूलित , संगणकावर त्याची माहिती वैगरे, वेगळ्या भाष्या, पुस्तकांची वेगवेळी प्रकार, विषय हाताळायला, वाचायला मिळाली, गंमत म्हणजे, भाषा परिचयाची समजली नाही तरी त्यातील रंगीत गुळगुळीत कागदावरची चित्रे पाहुन मज्ज़ा यायची!

बक्षिस म्हणुन मिळालेली पुस्तके! आजही आहे!

डिजिटल युगातली ईपुस्तके वाचली तरी एक हुरहुर लागते.. कागदी पुस्तकच वाचायची! घरातील वातानुकूलीत खोलीत सगळ्या सुखसोयी उपभोगतांनाही निसर्ग़ाच्या सानिध्यात वाचलेलीच पुस्तके लक्षात राहिली आहे... 

शांतता मनात तेंव्हा जास्त होती पुस्तक वाचतांना त्या कौलारू घराच्या छतावर बसून वाचलेली!

हो अजून ही वाचन चालू आहेच! पण पद्धत वेगळी!


Rate this content
Log in