Meenakshi Kilawat

Tragedy

5.0  

Meenakshi Kilawat

Tragedy

साथीने मोठमोठी कार्य होतात

साथीने मोठमोठी कार्य होतात

3 mins
903


     सर्वसाधारण प्रत्येकाला कुणाचा तरी साथ असतोच.या साथीने आपण मोठमोठे कार्य ही करू शकतोय. देशाची तरक्की, अपार उलाढाली, आपल्या संसारतही विना  आधाराने कोणतेच कार्य यथोचित पार पडत नाही. या अथांग जनसागरात एकटे राहाण्या विचारच शिवत नाही.


      सोबत असुन आम्हास अमुल्य असा सर्वांचा साथ आज प्रगत एफ-बी. आणि व्हा-अप गृपमुळे ही मिळतो आहे, जिवाभावाच्या अनेक मित्र मैत्रीनींचा साथ मिळाला आहे. जेंव्हा ऐन युद्धाच्या वेळी अर्जुनाला कृष्णाचा साथ मिळाला होता.त्याचप्रमाणे जिवन जगण्याकरीता या अथाह जनसागरात साथीची गरज महत्वपुर्ण असते.त्याचप्रमाणे अहर्नीश झटणाऱ्या घडविणाऱ्या लोंकाचाही साथ मिळला पाहिजे. महत्वाचे म्हणजे कुटूंब असत.या कुटूंबातील लोकाचीही साथ असणे गरजेचे आहे परंतू एका हाताने टाळी वाजत नाही. त्यासाठी सतत प्रयत्न करावा लागत असतो. सु:खदु:खात बरोबरीचा वाटा असावा लागतो. प्रेम मनातून कराव लागत तेंव्हा हा अमुल्य साथ टिकत असतो.


         एकदा मी काही कामानिमित्य बाहेर गावी ट्रेनमधून प्रवास केला होता. त्या दिवशी ट्रेनमधे बरीच गर्दी होती. मी माझ्या सीटवर बसून वाचणाला सुरवात करणार तेवढ्यात बाजूच्या लेडीज कंम्पार्टमेंटमधे काही घटना झाल्याची चाहुल लागली, म्हणुन दाराशी येवून बघते तर काय एका महिलेला बेशुद्धावस्थेत बाहेर प्लाटफार्मवर काढले, पुरती चौकशी केली असता. प्रकरणाला वाचा फुटली.ती महिला फक्त तीस वर्ष वयाची होती ,तिच्या सासरी तिला मारून टाकण्याचा प्रयत्न केला ,म्हणुन ती माहेरी आली ,तिथे तिला त्यापेक्षा जास्त त्रास माहेरवाल्यांनी दिला.आता तिच्या भावाने जबरदस्ती ट्रेनमधे आणुन बसवले व तो निघून गेला. त्या महिलेने आपली दुखद पुर्ण जीवन कथा डब्यातल्या महिलांना सांगितली,कुठे जाणार हे ही तिला माहित नव्हत. सासरचा तर प्रश्नच उरला नव्हता. 


       ती सारखी रडतच होती. ट्रेन चालू झाली. पदराने डोळे पुसत ती उठली. व दरवाज्यातून उडी घेणार तोच तिथे टॉयलेट मधून निघालेली बेसिनमध्ये हात धुवायला उभी असलेली एका महिलेच्या लक्षात आले , तिने तिला धरून ठेवलय,तु काय करते आहे ? विचारलय,ती त्या बाईला सोड मला म्हणुन तिच्या बंधनातून सुटण्याचा प्रयत्न करीत होती.सर्वांना त्या बाईने आवाज दिला.तो पर्यंत सर्व महिलांनी मिळून तिला आवरले ,तरी ती सुटण्याचा प्रयत्न करीत म्हणत होती ,सोडा मला, नाही जगायच ,माझ कोणी नाही,मी कुठे जावू ,काय करू, अशी रडून म्हणत होती. तिची आर्त वेदना बघून त्या महिलाच्या डोळ्यात अश्रृ दाटले. ती महिला रडून-रडून बेशुद्धवस्थेत गेली.सर्व महिला घाबरून गेल्या होत्या. तेंव्हा दुसऱ्या केबीनमधून ड्युटिवर असलेल्या पोलीस शिपाई व टी.टी.आयला बोलावून त्यांना पुर्ण तपशिलवार घटना बाकीच्या महिलांनी सांगितली. 


       लगेच स्टेशन आलेले पाहुन त्यांनी रेल्वे कर्मचारी बोलवून तिला हॉस्पिटलमधे नेण्यात आले .नंतर काय झाले त्या महिलेचे हे कोणालाच माहित नाही. मन सुन्न करून सोडणारी घडलेली गोष्ट, किती विदीर्ण करून सोडणारी होती. या जगात कितीतरी महिलांच रोज दहन होतय, कितीतरी महिलांच रोज अश्या मरून-मरून जगतात. "हे जीवन किती कठीन स्त्रीजातीसाठी किती भयंकर आहे. "किती राजरोसपणे स्त्रीचा अपमान करून जीवंतपनी नरक यातना भोगतांना दिसतात. कधी सुधार होणार या बुरसटलेल्या विचारांचा ? कोण आहे याला जवाबदार? कोणाला दोष ध्यायचा ? हे जीवन कितीतरी खाचखळग्यानी भरलेले आहे. कुणाला सुखाची परीभाषा करता आलेली नाही. कुठे आहे सुख व नितळ आनंद त्यापेक्षा या मायानगरीतून काही वेळ का असेना आपले मन जाणनारे न दिसणारे साथी जवळचे वाटतात. म्हणून मी म्हणते ! आज शिक्षणाची तर गरज आहे पन तितकीच गरज संघ संघटनेला ही आहे , आणि कोणतेही कार्य आपण एकजूटीने करू शकतो. या कल्पना विश्वात रममान होत असतोय. सर्वजण एकत्र येवून नविन काही शिकू शकतोय. आणि अल्प का असेना आनंद प्राप्त करू शकतोय.


      अशाच प्रकारे कुटुंबातील सर्व लोकांचा जसा लळा आपणास असतोय, तसेच इतर कार्याचाही इतर आवडीनिवडी ही आपण मनापासून जपाव्यात.धन कमवण्यापेक्षा ही मन कमवण्याकडे कल असायला हवा. तो आयुष्यात आपल्या ह्रदयात स्वांनद भरतोय व आपल्याला भावविश्वात रममान करतोय. आणि माणसाला आपले स्थैर्य प्राप्त होत असते. हक्काची लोकही मिळतात. आपल्या आवडी निवडीत प्राविन्य मिळवून आप्तेष्ठांना आनंद देणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. हा विषय खऱ्या प्रगतिचा द्योतक आहे. अनुभवांतून मनुष्य मोठा होतो.जे तनामनाने दुसऱ्या कुणासाठी झटतात त्यांना आनंद मिळतोय. आम्ही सर्व महिलां एकजुटिने एक होवून एकमेकांचे भावना जाणून आपले ध्येय गाठू शकतोय.व स्वानंद मिळवून स्वता:ला हातभार लावू शकतोय. 


"कृतिशिल प्रयत्न प्रेरणेला एक दिवस

पारितोषिकाचे आंदण मिळतेच हमखास"


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy