Jyoti gosavi

Horror

4.1  

Jyoti gosavi

Horror

रंजामुंजा भाग 2

रंजामुंजा भाग 2

5 mins
187


रंजामुंजा भाग 2

(भूत कथा) 


काका उर्फ घनश्‍याम सडाफटिंग माणूस सहा भावंडात शेंडेफळ, दुर्दैवाने आई-वडील लवकर गेले आणि मग परिस्थितीचे चटके खात, धक्के खात, हा माणूस हैदराबाद वरून देशावरती आला.भावंडे आपल्या आपल्या संसारात रमलेली होती.त्यामुळे मागे कोणाचे पाश नव्हते."जिकडे भरेल दरा, तो गाव बरा" अशी फिरस्ते गिरी चालू होती.पूर्वजन्मीच्या पुण्याइने सद्गुरु भेटले आणि अध्यात्माची गोडी लागली.सरळ उठले आणि गाणगापुरी जाऊन राहिले .सकाळी उठून रोज संगमावर स्नान करावे, भस्माचे पट्टे ओढावे, आणि गुरुचरित्राच्या पारायणाला बसावे असा दिनक्रम सुरू झाला.दुपारी पाच घरी भिक्षा मागायची जे मिळेल त्यावर समाधान मानायचे आणि पुन्हा नामजपाला बसायचे.अशी जवळजवळ सहा महिने तपश्चर्या केली.सहा महिन्यानंतर दत्तगुरूंनी सांगितले ही जागा तुझ्यासाठी नाही तू इथून परत जा! त्यांनी पण हट्ट केला दत्ता मला तुझ्या शिवाय कोणी नाही मला मार्ग दाखव! तरच मी येथून जाईन अन्यथा मी जाणार नाही.झाले प्रत्यक्ष दत्तगुरूंची झगडा मांडला.पहिल्या दिवशी झोपले असताना कोणीतरी अंगावरून ओलांडून गेल्याचा भास झाला, दुसऱ्या दिवशी कोणीतरी धक्का मारून उठवत असल्याचे जाणवले .आणि तिसऱ्या दिवशी झोपले असताना चक्क उचलून एका जागेवरून दुसऱ्या जागी फेकून दिले.डोके एका दगडाला आपटले डोक्याला टेंगूळ आले.मग मात्र घनश्याम घाबरला आणि गाणगापूर सोडले.तिथून उठले आणि मजल दरमजल करीत कोणत्यातरी एखाद्या अज्ञात गावी दुर्गा मातेच्या मंदिरात मुक्काम केला,आणि आता दुर्गा माते साठी साधना सुरू केली .पहाटे उठावे गावच्या नदीवर आंघोळ करावी, आता दाढी वाढवली होती भगवे कपडे घातले होते अंगातली छाटी धुऊन वाळवावी ,दुसरी छाटी नेसावी आणि देवीच्या ध्यानात मग्न व्हावे. मग कधीतरी दुपारी बारा वाजता ध्यानधारणा संपल्यानंतर गावात जाऊन पाच घरी भिक्षा मागावी .आता भगव्या कपड्यांचा परिणाम म्हणून लोक जागेवरती आणून देत असत .ते फक्त कोरडी भिक्षा घेत आणि स्वतः शिजवून खात .हळूहळू समाधी लागू लागली. ध्यान जमले, दोन वर्षे त्या गावात काढल्यानंतर देवीने दृष्टांत दिला की,  तू माझी खूप भक्ती केलेली आहेस खूप नामस्मरण केले आहेत परंतु हा मार्ग तुझ्यासाठी नाही .आताही साधना संपव आणि येथून जा .त्याबरोबर त्याने हट्ट धरला माते!मला तुझे दर्शन पाहिजे. देवीने सांगितले वत्सा! तुला माझे ते तेज सहन होणार नाही. त्यामुळे तू नको तो हट्ट करु नकोस .त्याऐवजी अजून काही माग. परंतु यांनी मला अजून काही नको तुझ्या दर्शनच पाहिजे, असा हट्ट केला. शेवटी देवी ने सांगितले आज रात्री सर्व गाव झोपल्यानंतर, सर्व सामसुम झाल्यानंतर, इतर कोणीही नसताना, मी तुला दर्शन देईन. मात्र त्यावेळी घाबरू नकोस! झाल, रात्र झाली हे मोठ्या उत्कंठतेने सामसूम होण्याची वाट बघत बसले. व देवीचे ध्यान लावून बसले. डोळे बंद न करता एकटक देवीच्या मुखाकडे पाहत बसले. मनात "ओम दुर्गा देवी नमो नमः" असा जप चालू होता. 


दुर्गा देवीचे दर्शन


रात्री दीड दोन वाजता अचानक विजांचा कडकडाट व्हावा तसा आवाज आला आणि देवीच्या मूर्तीतून एक विजेचा लोळ बाहेर पडला, यांच्या दिशेने येऊ लागला. 

त्याबरोबर ते घाबरले आणि देवीला म्हणाले पुढे येशील तर तुला दत्तगुरूंची शपथ आहे. त्याबरोबर येणारे तेज लुप्त झाले. 

रात्री स्वप्नात देवी आली आणि तिने दृष्टांत दिला. 

अरे बाळा! तरी मी तुला सांगत होते की, माझ्या दर्शनाचा हट्ट करू नको. परंतु तू ऐकले नाहीस, आणि या दर्शनाच्या हट्टापायी जी माझी साधना केली होतीस ती वाया गेली, आणि दत्तगुरूंची शप्पथ घालून त्यांची केलेली साधना देखील वाया घालवली. 

तू आता पुन्हा तुझ्या सद्गुरुं कडे जा! पुन्हा सद्गुरुं कडे गेले  सद्गुरुनी सांगितले" मी तुला कोणतीच साधना करायला सांगितली नव्हती, तू तुझ्या मनाने ती केलीस! म्हणून तुला पश्चातापाची वेळ आली. 

देवाकडे काय मागावे? हेदेखील तुला समजले नाही. 

मग त्यांनी सद्गुरूंचे पाय धरले आणि मला अनुग्रह द्यावा अशी तळमळीने प्रार्थना केली. गुरूंनी काही न बोलता स्वतःकडे काही दिवस ठेवून घेतले ,गुरूदेखील कोणी आश्रम वाले संन्यासी बाबा नव्हते ,तर घर गृहस्थी सांभाळणारे संसारी माणूस होते .

घनश्याम ने मन लावून गुरूंच्या घरातील सर्व कामे केली, गुरूंची सेवा केली, गुरूंना बिछाना घालून देणे, त्यांचे पाय दाबणे, गुरु सांगतील ती आज्ञा प्रमाण मानणे, इत्यादी गोष्टी पाळल्या. 

शेवटी एक दिवस सद्गुरू नी अनुग्रह दिला आणि समोरच ध्यान लावून बसायला सांगितले.  

ध्यानामध्ये असताना एखाद्या सिनेमातील दृश्य पहावे त्याप्रमाणे एका बाजूला" एक स्त्री व तीन मुली दाखवल्या" तर दुसर्‍या बाजूला चक्क हिमालयामध्ये तपश्चर्येला बसलेला संन्यासी दाखवला ,आणि यातील तुला काय पाहिजे? असे विचारले. 

त्यावर त्याला गृहस्थ धर्माची आवड वाटली, आयुष्यात कधी प्रेमा असे मिळालेच नव्हते. जीवनाची निव्वळ भटकंती चालली होती. त्यामुळे त्यांनी ती स्त्री आणि तीन मुली त्याच्या कडे बोट दाखवले. गुरूंनी सांगितले तुला पाहिजे तो मार्ग मिळेल तू आता येथून जा तिथून उठले. 

त्यांना हे चांगलेच माहीत होते की, आपल्या नशिबात तीन मुलीच आहेत .पण त्या माऊलीला मात्र एखादा कुलदीपक असावा असे वाटत असे. आणि बायकोच्या हट्टाखातर त्यांनी पण त्या भगता कडे जाण्यास सुरुवात केली. यातून काही निष्पन्न होणार नाही हे त्यांना चांगलेच माहीत होते. मात्र एक गोष्ट खरी गेल्या दहा वर्षात त्या गावात त्यांची "पत" चांगलीच सुधारलेली होती. एक संसारी संत म्हणून लोक त्यांच्याकडे आदराने पाहत असत .घरगुती अडचणीसाठी उपाय विचारण्यासाठी येत. 

ते लोकांना अध्यात्मिक तोडगे सांगत होते. तेही विनामूल्य, लोकांना त्यांचा चांगला अनुभव देखील येत होता. त्यांच्या तोंडून निघालेल्या गोष्टी खऱ्या ठरत होत्या. जशी काय त्यांना वाचा सिद्धी होती. 

एकदा एका चा बैल हरवलेला, त्या माणसाने सगळी पंचक्रोशी शोधली, परंतु बैल सापडत नव्हता. आणि यांनी सांगितले गावाच्या पश्चिमेला चिंचेखाली बैल उभा आहे. आणि खरोखरी बैल तेथे मिळाला. त्यांच्या शब्दाप्रमाणे या वर्षात तुझ्या मुलीचे लग्न जुळेल असे जर कोणाला सांगितले तर ते होतच असे. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी देखील ते लोकांना वेगवेगळ्या देवतांचा जप करायला सांगत असत परंतु म्हणतात ना स्वतःची विद्या कधी स्वतःला लाभत नाही तसेच त्यांचे झाले होते त्यांची विद्या त्यांना मात्र त्यांच्या दारिद्र्यातून बाहेर काढू शकत नव्हती. 

पण लोक त्यांना खुप मानू लागले. परंतु ते कोणाकडून ही पैसा घेत नसत कोणी खुशी ने पैसे दिले तर ठिक, पण मागायचे मात्र नाही. 

हे त्यांचे ब्रीद होते .

बायको म्हणायची आपली परिस्थिती गरिबीची आहे, तुम्ही लोकांना फुकट उपाय का सांगता ?त्यावर ते म्हणायचे माझी विद्या मी विकणार नाही. मी लोकांना पैसे मागितले तर माझी एवढ्या वर्षांची साधना व्यर्थ जाईल. 

असो तर असे हे जोडपे मुलाच्या हव्यासापायी त्या भगता कडे गेले. पण त्यांना गुण आला की नाही माहीत नाही परंतु त्यांच्या मोठ्या मुलीच्या पायातून मुंजा मात्र घरात आला. 

मुलीच वागणं बदललं होतं. तिचा बाहेरच्या जगाशी संपर्कच नव्हता. 

ती आपल्या मध्येच मग्न होती. आणि मग शेवटी तिला पण त्या भगता कडे नेण्याचे ठरवले .एकदा का रस्ता चुकीचा निवडला की सगळे पावले चुकीची पडतात .त्यांचे तसेच झाले. ते अजून आपली तरणीताठी मुलगी त्या देवताळ्या कडे घेऊन गेले. तो जशीकाही वाटच पाहत होता. त्याला माहित होते की हे सावज आपल्याकडेच येणार आहे. त्याने रंजू ला देखील, 

त्यादेवी समोर बसवलं. आणि तो घुमू लागला आपल्या अगम्य भाषेत देवीकडे पाहून बडबडू लागला. त्याच्या पिंजलेल्या जटा जोराजोरात हलवू लागला. तांबरलेले डोळे गरगर फिरू लागला. आणि काय चमत्कार देवीपुढे ठेवलेले लिंबू टुण्णदीशी उडी मारून सर्वांच्या देखत रंजू च्या ओटी मध्ये पडले. 

"जय दुर्गा मैया" असे म्हणत त्याने डोळे उघडले देखो देखो देवी मा के उसके कृपा हो गई है ऊस मे देवी माॅ आ गई है /उसका सन्मान करना/ कल्याण हो जायेगा/ असे म्हणून तिच्या कपाळाला त्याने कुंकू लावले . त्याबरोबर वडिलांनी आपल्या तुटपुंज्या कमाई मधून जे काही कनवटीला पैसे होते ते सर्व देवीपुढे अर्पण केले आणि घराचा रस्ता धरला.


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror