Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

राजभाषा दिन

राजभाषा दिन

1 min
259


 मराठी राजभाषा दिन म्हटले की डोळ्यासमोर येतात ते म्हणजे वि.वा.शिरवाडकर,अर्थात विष्णू वामन शिरवाडकर. ते मराठीचे कवी,लेखक ,समीक्षक,नाटककार,कथाकार होते.

   यांचा जन्म २७ फेब्रुवारी १९१२ साली झाला.हा दिवस आपण 'भाषा गौरव दिन 'म्हणून साजरा करतो.

  मराठी मनावर चार दशकांपेक्षा जास्त काळ राज्य गाजवणारे श्रेष्ठ प्रतिभावान कवी आहेत.हे अती प्रामाणिक होते.समाजाबद्दल आपुलकी,प्रेम होते.शब्दकलेवर त्यांचे प्रभुत्व होते.

  पौराणिक व ऐतिहासिक व्यक्तिमत्वामधील मानवी वृत्तीचा शोध घेण्यासाठी त्यांनी समाजाला प्रवृत्त केले.चिकित्सक वृत्ती जोपासायला लावली.

  कवी कुसुमाग्रजांच्या टोपण नावाने हे कविता करत असत.यांच्या कविता तरूणांना प्रेरणा देणार्‍या आहेत.त्यांनी महाराष्र्टाच्या सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे.मराठी भाषेला ज्ञानभाषा बनवण्यासाठी अथक प्रयत्न केले.

  त्यांचा पहिला काव्यसंग्रह 'जीवनलहरी' दुसरा काव्यसंग्रह 'विशाखा' होय.

  धार्मिक चित्रपट'सती सुलोचना' यात त्यांनी अभिनेत्याची भूमिका साकारली होती.

  'नटसम्राट', 'वीज म्हणाली धरतीला' या त्यांच्या नाटकांना 'ज्ञानपीठ' व 'पद्मभूषण' पुरस्काराने गौरविले आहे.ज्ञानपीठ पुरस्कार घेणारे मराठी साहित्यातील हे दुसरे कवी आहेत.

  अक्षरबाग,किनारा,मराठी माती,प्रवासी पक्षी,श्रावण,जीवनलहरी,इत्यादी कवितासंग्रह त्यांनी लिहिले आहेत.

  आजही मराठी वाचकांच्या ह्रदयावर,रसिक जनांच्या मनात वि.वा. शिरवाडकर अर्थात कवी कुसुमाग्रज जीवंत आहेत.

  मराठी भाषेतील त्यांचे स्थान अढळ आहे.अशा या कवींना मनापासून वंदन करते.


Rate this content
Log in