Jyoti gosavi

Others

2  

Jyoti gosavi

Others

प्रिय नोकरी

प्रिय नोकरी

2 mins
71


थांबा !थांबा! अभिनंदन करण्याआधी पोस्ट बारकाईने वाचा. 

अहो माझी" मॅरेज ॲनिवरसरी" नाही तर आज माझ्या नोकरीचा 35 वा वाढदिवस आहे. 


म्हणजे 35 वर्षे ती आणि मी अविरत बरोबर आहोत. 


35 वर्षांपूर्वी आजच्या तारखेला 25/8/1987 रोजी मी "प्राथमिक आरोग्य केंद्र दाभोळ" तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी येथे कामावर रुजू झाले. 

प्रिय नोकरी तू मला 35 वर्ष साथ दिलीस. 

तुझं बोट पकडून मी कुठे कुठे फिरले, मग ते दाभोळ असो, मोखाडा असो, बेंगलोर असो, नाहीतर उरण असो, नंतर पुणे आणि मुंबई, पण तू सोबत असल्यामुळे मला कधी एकटं वाटलं नाही .

तू मला खूप काही दिलंस, तुझ्यामुळे मानसन्मान मिळाला, तुझ्यामुळे कधी कोणापुढे हात पसरण्याची वेळ आली नाही. 

कधी लाचार व्हावे लागले नाही. 

कोणाला तरी मागण्यापेक्षा कोणालातरी देता आले. 


तुझ्यामुळे माझे स्वतःचे लग्न वडिलांना एक पैसा देखील खर्च करायला न लावता, माझे लग्न👫💏💍👏🎉💒🍸मला जिद्दीने करता आले. त्याचा मला अभिमान वाटतो. 

तुझ्यामुळे सुखासीन आयुष्य मिळाले, तुझ्यामुळे स्वतःचे हक्काचे घरदार झाले. 

हा आता एवढा टप्पा गाठताना सारं काही सुखा सुखी नव्हतं. 

त्यासाठी हाल अपेष्टा सोसाव्या लागतात ,आणि खस्ता खाव्या लागतात. 


सुरुवातीच्या काळात "व्हॅक्सीन कॅरिअर" हातात घेऊन पाच पाच किलोमीटर चालावं लागलं, दोन दोन तास बोटीतून प्रवास करावा लागला, कुडाच्या झोपडीत राहिले,,आदिवासी भागात काम केले, पण जेथे जाते तेथे तू माझ्या सांगाती होतीस. त्यामुळे हे काहीच वाटले नाही. 

आताही काही रेड कार्पेट वरून चालत नाही. रोज सहा तासाचा प्रवास करावा लागतोय, पण सुखाने मिळवलेल्या आयुष्याला किंमत देखील नसते. कष्टाने मिळवलेली गोष्ट खूप मौल्यवान असते ,आणि त्यात एक स्वाभिमान देखील असतो. 

अशीच अजून दोन वर्षे मला साथ संगत दे. 

तुझे मनापासून आभार


Rate this content
Log in