Vasudha Naik

Others

2  

Vasudha Naik

Others

प्रेम

प्रेम

2 mins
117


प्रेम या अडीच अक्षरी शब्दामधे चुंबकासारखी ओढ आहे.अगदी जन्मल्या बाळापासून ते अतीवृद्ध मानवाला प्रेम हवेच असते. त्या प्रेमावरच त्याची मानसिकता अवलंबून असते.*

   *प्रेम आईचे मुलांप्रती असते याची किंमत कशातही मोजता येत नाही. पावणेसात महिन्याच्या बेबीला त्याच्या आईबरोबर कांगारू थेरीपी म्हणजेच आईच्या प्रेमाचा विश्वासच तर देतात. पण यातून मुलाची मानसिक, बौद्धिक, शारिरीक होते. याचा अनुभव सध्या घेत आहोत. खरचच आई मुलाच्या प्रेमाची गणना कधीही,कोठेही होणार नाही.*

   *बाबांचे मुलांवरील प्रेम न दिसणारे. पण नजरेत व ह्रदयाच्या बंद कुपीत साठवलेले असे प्रेम दिसत तर नाही पण अमाप असते. ते फक्त मुलगी सासरला निघाली की पाहायचे बाबांचे डोळे अन हेलकावणारे मन. या प्रेमाचा दिखावा फक्त आणि फक्त नजरेतून समजतो.*

   **आता प्रेम हे आपण सजणाचे सजणीवर व सजणीचे सजणावरील पाहू. हे प्रेम लगेचच ओळखता येते. नजरेतून,स्पर्शातून जाणवणारे हे प्रेम एकमेकांची काळजी दाखवते.*

*अगदी साध्या साध्या गोष्टीतून हे प्रेम दिसून येते*

   *तरूण तरूणीची ओळख होते. मग नजरेची भाषा समजायला लागते. मग प्रियकर गजरा देतो. दोघांनाही एकमेकांची साथ खूप आवडते. कोठेही जाताना फक्त* *एकमेकांबरोबर वेळ घालवायला आवडते. अशी अगणीत उदा.देता येतील. तर असे हे प्रेम सर्व माणसातही नजरेचे बाण सोडून कसे होते हे पाहायला मिळते*


Rate this content
Log in