Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

प्रामाणिक

प्रामाणिक

2 mins
158


  राम नावाचे शिक्षक निगडी गावात सेंट जोसेफ या शाळेत मराठी विषय शिकवत असतात.त्या शाळेत ते दहा वर्षापासून नोकरी करत असतात.मुलांचे,शिक्षकांचे आवडते सर असतात.

  मुख्याध्यापकांच्या सर्वच कामात सदैव तत्परता दाखवणारे राम सर मुख्याध्यापकांच्याही मर्जीतील असतात.

  एक दिवस प्रशासकांचे पत्र येते की राम सरांची बदली ठाणे जिल्ह्यातील सेंट जोसेफची दुसरी शाखा आहे येथे झाली होती.

  राम सर सर्वांचा निरोप घेतात.निरोप घेणे अवघड झाले होते.मुलांचे लाडके शिक्षक असल्याने मुले रडत होती.शिक्षकप्रीय असल्याने शिक्षकात उदासिनता होती.मुख्याध्यापकांनी नाखुशीनेच जाण्याची परवानगी दिली.सर्वांचा निरोप घेवून,सामान घेवून राम सर एस.टी. मधे बसले.त्यांचा प्रवास चालू झाला.

  एस.टी.च्या कंडक्टरला माहित होते.हे सर आहेत व त्यांची बदली आपल्याच गावी झालीय.

  ठाण्याचे तिकिट काढताना कंडक्टरने राम सरांना दहा रू.जादा दिले.

  राम सरांना समजले पैसे जादा आलेत आपल्याला,त्यांनी विचार केला,रोज हा कंडक्टर कोणाला,दोन रू,कोणाला एक रू.कमी देत असतोच की.दिवसभरात तो सहजच पन्नास रू.काढत असेल या पद्धतीने.पैसे सुटे नाहीत हे बोलून पैसे लुबाडतोच की.एखादा प्रामाणिकही असतो.आज आपल्याला दहा रू.चुकून आलेत..सर शांत राहिले.

  गाव आले .सर उभे राहिले.एस.टी.तून खाली उतरताना कंडक्टरला दहा रू.परत करतात.कारण शिक्षकाचे मन गप्प बसू देईना.हा खोटेपणा नको करायला या भावनेनं त्यांनी ती दहाची नोट कंडक्टरला परत केली.

  कंडक्टर बोलला "सर मला माहित होते आपण शिक्षक आहात .या गावी आपली बदली झालीय .मी मुद्दाम जास्त पैसे आपल्याला दिले.कारण आपणच माझ्या मुलांना शिकवायला येणार होतात.मग तुमच्याच प्रामाणिकपणाची परीक्षा घेतली.साॅरी पण माझ्या मुलांचा शिक्षक खरच प्रामाणिक आहे का? हे पाहायचे होते.पण आपण यात १००% पास झालात आता मुलांचे भविष्य उज्वल आहे.हे मी छातीठोकपणे सांगू शकतो.

  राम सर चकीत होतात.खूश होतात,झपाझप पावले टाकत सेंट जोसेफ शाळा गाठतात.



Rate this content
Log in