vaishali vartak

Romance

3  

vaishali vartak

Romance

फुलले हे क्षण माझे

फुलले हे क्षण माझे

1 min
230


माझ्या मनीच्या इच्छा 

केल्या पूर्ण सहजीवनी

 साथ तुझी मिळता 

भाग्यवान वाटे मनी


भाव मम अंतरीचे

 तू जीवनी जाणिले 

सहज देत हात हाती 

सप्तरंगी रंगविले


सहवास तुझा माझा 

प्रीत गंध पसरला 

एकमेका देत साथ 

संसार ही फुलवला


आहे मज समाधान 

दिधले तू सर्व काही 

भरभरुनी जीवनी 

मागणे उरत नाही


फुलले हे क्षण माझे 

तव कृपा प्रसादाने 

मन माझे आनंदले 

जगले जीवन मोदाने


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance