दिपमाला अहिरे

Inspirational

4.4  

दिपमाला अहिरे

Inspirational

फरक (अतिलघुकथा)

फरक (अतिलघुकथा)

1 min
456


कपडे चांगले निघत नाही जरा जोर लावुन धुत जा सुनबाई.आईने शिकवलं नाही का कपडे कसे धुवायचे ते..खायला कसा जोर येतो..

हाताचे तुकडे होईस्तोवर घासुन, घासुन लख्ख धुवुन पांढरीशुभ्र साडी तिने बाहेर वाळायला टाकलेली पाहुन बाजुच्या व्हरांड्यात पेपर वाचत बसलेल्या रीटायर्ड शिक्षीका मावशी बोलल्या

आमची कामवाली बाई फक्त पाण्यातुन कपडे काढून दोरीवर लटकावते..तु किती छान धुतेस गं कपडे.

विचारांचा फरक समजायचा की, पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या मानसिकतेचा..


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational