akshata alias shubhada Tirodkar

Tragedy Inspirational Thriller

3  

akshata alias shubhada Tirodkar

Tragedy Inspirational Thriller

फ्लॅट नंबर ३०६ भाग ११-अंतिम भाग

फ्लॅट नंबर ३०६ भाग ११-अंतिम भाग

4 mins
210


हल्लेखोर महिला आहे हे ऐकताच सोसायटीच्या जमलेल्या लोकांमध्ये कुजबुज सुरु झाली कारण ही तसेच होते असे कोणी पाऊल उचलेल असे कोणालाच वाटत नव्हते 


"इन्स्पेक्टर साहेब कोड्यात न सांगता सरळ कोण आहे ती सांगून टाका उगाच मनाला घोर नको "


"बरोबर आहे तुमचं मिसेस सुर्वे पण हे सत्य आहे तर हल्लेखोर एक महिला आहे जी नी पूर्ण प्लॅन रित्या हे आखलं पण ती यात फसली "


"कांचन नाईक काय वाटतं कोण असेल? तुमचा कोणावर संशय असेल तर सांगा पाहूया तरी तुमचे उत्तर बरोबर येते कि नाही ते "


"नाही माझा कोणावर संशय नाही "


"कसा असेल मिस कांचन कसा असेल कारण ती हल्लेखोर आणि कोणी नाही तुम्ही स्वतः आहात "


"हे ऐकताच सगळे आश्चर्य चकित होऊन म्हणाले" काय "?


"हो तुम्ही सगळ्यांनी जे ऐकले ते खरं आहे कांचन स्वतः हल्लेखोर आहे "


"काय मिस कांचन खरं आहे ना "?


"मी मी का करेन असं "


"अच्छा तु का केलंस हे मला जाणुन घ्यायचेच आहे त्यापुर्वी तु केलेल्या चुकानी तुला पकडुन कसे दिले ते जरा ऐक 


क्रमांक १

कोणीही धमकी चे पत्र पुराव्यासाठी सांभाळून ठेवेल कारण जीवाचा प्रश्न होता पण तू तर ते हरवलं असे म्हणून मोकळी झालीस 


क्रमांक २

तु सांगितले होते की सोफ्यावर बसली असताना हल्ला झाला आणी गॅलरीतुन‌ कोणी आला असेल पण मी त्याच जागेवरून बसुन पाहिले तर गॅलरीत कोणी आला असता तर तो तुझ्यावर समोरून हल्ला केला असता बाजुंनी नाही कारण गॅलरी समोर आहे


क्रमांक ३

तुला झालेली जखम किंवा तो वार दुसऱ्या व्यक्तीने बाजुने‌ केला असता तर जखमेचा घाव वेगळा असता तो असा नसता जो तु स्वतःला काळजी बाळगत केलास 


क्रमांक ४

तु सांगितले कि धमकी चे पत्र कोणी खिडकीतून फेकले आणि धमकी चे पत्र दगडात गुंडाळले होते तर तुझ्या खिडकीच्या काचा कश्या फुडल्या नाहीत ?

 

क्रमांक ५


आपल्यावर जीव घेणा हल्ला झाला तरी आता तुला भीती वाटत आहे तशी भीती तुझ्या चेहऱ्यावर दिसलीच नाही 


"आता बोला मिस कांचन बरोबर बोलत आहे ना "?



कांचन मान खाली खालून बसली हे पाहून मिसेस सुर्वे म्हणाली "बोल ना उगाच गाजावाजा केलास ताप मात्र आमच्या डोक्याला"


"हे बघ कांचन तुझा प्लॅन फ्लॉप झाला आता सत्य सांगण्याखेरीस तुच्याकडे काही पर्याय नाही "


सगळे सोसायटी वाले तिच्यावर बोल बोल म्हणत तुटून पडले तसे मोहित ने आणि शिंदे नि त्याना शांत केले 


आपले डोळे पुसत तिनी सुरवात केली सोसायटीत माझ्याबरोबर कोणाचे पटत नाही त्यामुळे गेली चार पांच वर्ष मी कोणाच्या संपर्कात नाही ना कोणी माझी विचारपूस करायला आले ते पण का येणार माझ्या अश्या विचित्र स्वभावामुळे मी कित्येकांचा अपमान केला त्याच्या बरोबर विनाकारण वाद घातला माझे आई बाबा खुप चांगले होते ते असताताना आमच्या घरी सोसायटीतले यायचे पण मी मात्र त्याच्याशी चांगले वागायची नाही आईबाबा गेल्या नंतर कोणीच घरी फिरकले नाही माझ्या अश्या गर्विष्ठ स्वभावामुळे मी अविवाहित राहिले आई बाबा नि आणलेल्या प्रत्येक स्थळाला मी काहीना काही कारण काढून नाकारले मग काय वय होत गेलं आणि माझा स्वभाव सगळयांना परिचित झाल्या मुळे स्थळ येणे हि बंद झाले आई बाबा गेल्या नंतर मी नोकरी सोडली आई बाबानी पैसे ठेवलेलं त्यावरच जीवन जगायचं ठरवलं पहिली पहिली हा एकटेपणा मज्जेत गेला मग मात्र एकटेपणाचा कंटाळा येऊ लागला शेजारी हि कोणी नाही मित्र मैत्रिणी हि नाही नातेवाईक हि नाही त्यामुळे तो एकटेपणा खायला उठला सगळे सोसायटी वाले हसताना ऐकून वाटायचं कि आपण पण त्याच्यात मिसळून हसावं पण मला कोणीच जवळ करणार नाही हे माहित होते मग मनाशी ठरवलं नवीन कोणी राहिला आले कि त्याच्याशी दोस्ती करायची पण भावनिक आधारे आणि ३०४ मध्ये देवधर कुटूंब आले मला माहित होते सोसायटीतले हे लोक त्याना माझ्यापासून लांब राहा म्हूणन सांगतील म्हणून मी प्लॅन केला स्वतःच धमकी चे पत्र लिहून देवधर यांना दाखवण्यास गेले मला त्याची सहानभूती मिळाली मग आणखी सहानभूती मिळवण्यासाठी स्वतःवर हल्ला केला 


"काय स्वतःवर हल्ला केलास मग पोलीस स्टेशन वर का केलीस "?


"ती एकटी आली नव्हती तिच्या सोबत आणखी कोणी होते आणि त्याच्यामुळेच सत्य बाहेर आले "


"कोण सोंबत होते" 


"देवधर दाम्पत्य"


"काय तुम्ही तर सांगितले होते कि ती एकटीच आली होती "


मोहित ने अमित आणि अवनी बदल सगळे सांगितले आणि त्याचे अभिनंदन गेले त्यांनी जर हा पुढकार घेतला नसता तर सत्य बाहेर आले नसते 


सत्य ऐकून सगळे सोसायटी वाले भावुक आणि नाराज हि झाले वयस्कर गोखले आजोबानी कांचन कडे पाहत म्हण्टले 


"कांचन तुच्या वागण्याचा तुला आता पश्ताताप होतो पण काय फायदा तेव्हा आमचे ऐकेल असते तर आज सुखी संसार करत असतीस मी पण तुला खूप समजवले पण तू माझा अपमान केलास कोणाचं बरोबर तू चांगली वागली नाहीस ना शेजाऱ्यांशी ना नातेवाईकांशी म्हणून कोणीच तुझ्या आता सोबतीला नाही तुझे आई बाबा खूप चांगले होते एकुलती एक लेक तू त्याची पण त्याना हि कधी सुख दिले नाहीस "


"धन्यवाद इन्स्पेक्टर साहेब डोक्याचे टेन्शन दूर केलेत उगाच आमची सोसायटी बदमान झाली असती "


"सत्य कधी हि लपून नाही राहत आणि पोलीस साच्या नजरेस तर काहीच नाही लपत चला शिंदे निघूया "


आणि पोलिसांची गाडी गेट बाहेर पडली आणि अवनी आणि अमितच्या डोक्यात असलेल्या ३०६ ची गुत्ती हि सुटली 



समाप्त


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy