Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

पहिली अनुभव

पहिली अनुभव

1 min
148


इयत्ता पहिली अनुभव...


 शनिवार दि.८/०७/२०२३

 शाळा दुपारी असते. इयत्ता पहिलीची मुलं साडेअकराला छान आले होते. वेळेच्या आधी पाच मिनिटे वर्गात हजर होती. साडेअकरा ते दुपारी दोन पर्यंत वेळ छान गेला. मुलांनी अभ्यास करून दाखवला. पण जरा यावर्षी मुलांना चॉकलेटचे आमिष जास्त दाखवावे लागत आहे.

  चॉकलेट देते म्हटल्याशिवाय ते लिहीतच नाहीत हल्ली. चला काही का असेना आपण चॉकलेट देते म्हटल्यानंतर लिहितात आणि मला समाधान वाटते. मुलांसाठी पेन्सिल,रबर, शारपनर,पाटीवरची पेन्सिल, चॉकलेट अशा अनेक वस्तू मी आणून ठेवलेल्या आहेत.दुपारी दोनला मधली सुट्टी झाली.

 तर झाले असे की नेहमीप्रमाणे मधल्या सुट्टी नंतर वर्गात गेले.

 चार मुलं दाराच्या मागे लपले होते . एक मुलगी त्यांना लपवत होती.  

  मी वर्गात आले. मुलं दाराच्या मागे काय करतात हा प्रश्न मला पडला. मी अगदी शांत बसले,वर्गात गेले. तर मुलांनी पटकन भय दाखवण्यासाठी भो.... केले... मी खूप हसले .

  मी वर्गात गेले. सर्व मुलं शांत बसली. गुड आफ्टरनून म्हणण्या ऐवजी गुड ऑक्टोबर वर म्हणू लागली..चुकीचे का होईना पण बोलत होती.

  मग मुलांना समज दिली. शांत केले. व अभ्यास चालू केला.अशी ही निरागस मुले, देवघरची ही फुले.. पण हल्ली जास्त समज असणारी ही पिढी कधी कधी शिक्षकांनाही आधुनिक तंत्रज्ञान, मोबाईलचे शिकवून जाते..

  या पिढीला समज खूप आहे, तसेच स्वतःचेच खरे करण्यात आनंद वाटतो.

  खूप वेगळे अनुभव येतात रोज या लहान मुलांचे.. आपण त्यांच्या कलेने घेतले की अशी मुलं अभ्यासाला तयार होतात... चला तर..

मुलांच्या कलेने घेऊया

त्यांच्यात रमून जाऊया

देशाचे उत्तम नागरिक घडवूया

समाजाचे भान ठेवायला शिकवूया....



Rate this content
Log in