Ranjit H Jadhav

Comedy Drama Romance

3  

Ranjit H Jadhav

Comedy Drama Romance

नशा बेधुंद प्रेमाचा

नशा बेधुंद प्रेमाचा

7 mins
395


सेकंड शिफ्ट संपवून रात्री बाराला ऑफिस मधून बाहेर पडलो आणि मोबाईल चेक केला तर रूम पार्टनर्स चे खूप सारे मिस्ड कॉल दिसले.... मी मयुर ला कॉल केला... तो बोलला

" किती वेळ लागेल पोचायला, दवाखान्यात जायचंय" खूपच बारीक आणि खचलेला आवाज.

"अर्धा तास"

"या लवकर".... फोन कट...🤔

नक्की काय झालंय हे समजून घेण्यासाठी मी अनिलला कॉल केला... तेव्हा मला सर्व स्टोरी समजली.

नक्की काय घडलं हे समजून घेण्यासाठी मी तुम्हाला थोडस फ्लॅशबॅक मध्ये घेऊन जातो.


                   ◆◆◆ फ्लॅशबॅक १. ◆◆◆

तर त्याच अस झालं.... मयुर कॉमर्स पदवीधर... सी. ए. च्या तयारीसाठी लायब्ररी ला अभ्यासाला जायचा... आज संध्याकाळी सातला परत येताना तो गंगा घाटावर गेला. तिथे महाशिवरात्री मुळे भांग वाटप सुरू होतं. नक्की काय असत हे बघण्यासाठी मयुर पुढे झाला तर सर्वजण भांग पीत होते.

मयुर ने सुद्धा हात पुढे केला तेंव्हा भांग देणाराने त्याला बजावलं....

"हा पहिला आणि शेवटचा".... "एवढं प्यायचं आणि घरी जाऊन गप्प झोपून घ्यायचं.... परत इकडे फिरकायच नाही."

मयुर ने तो ग्लास रिकामा केला. आणि फिरत फिरत तो रूम कडे निघाला. रस्त्यात त्याला त्याचे काही मित्र भेटले त्यांच्या आग्रहास्तव तो परत गंगा घाटावर गेला... आणि या मित्रांसोबत त्याने परत एक ग्लास भांग घेतली, भांग देणाराने केलेली सूचना त्याने अजिबात लक्षात घेतली नाही.

मयुर ला रूमकडे सोडून त्याचे मित्र निघून गेले......

आज मयुर ला खूप भारी वाटत होतं.... स्टडी,करिअर, जॉब.... भविष्य.... आता कसलच टेन्शन त्याला जाणवत नव्हतं.....🤠😍☺️ थोडक्यात काय तर भांग हळुहळू असर दाखवत होती. त्याच शरीर थोडं गरम व्हायला लागलं होतं... मन प्रसन्न, उल्हसित झालं होतं....🕺🕺🕺🏻

मयुर ने मित्रांना फोन केला

"लै भारी काम झालं आज भावांनो... थँक्स " आणि असच आजूनकाही बोलत मयुर रूम वर बसला होता.

आता भांग चा इफेक्ट थोडा वाढायला लागला... तो मयुर च्या बोलण्या वागण्यातून दिसायला लागला...

खिडकीत उभा राहून ...." जानेजिगर जानेतमन्ना...." 💃💃

परत एखाद जुनं रोमँटिक गाणं त्याच्या ओठावर यायचं...

मैं दुनिया भुला ....

ये राते ये मौसम... नदी का किनारा.....🏝️

अचानकच राजकारण्यांना शिव्या... 😤👹

मध्येच गावाकडचा शाळेतला एखादा किस्सा त्याला आठवायचा

मध्येच काहीतरी फ़िलॉसॉफी झाडायचा...

"च्यामारी पोरींना विचारलं की व्यस्त (engage) आहे म्हणत्यात आणि पोर तर सगळी सिंगलच .... सगळा माल नक्की जातोय तरी कुठं🤔🤔"

तो एका जागी थांबेना रूम किचन सर्वत्र तो येरझाऱ्या घालायला लागला... त्याच्या बोलण्याचा आवाज वाढला....

मोठमोठ्याने बोलत तो काहीही विषय हाताळायचा.... रूम वर मित्रांनाही गंमत वाटायला लागली... आता सर्वजन जेवायला बसले... बाकीचे पोर मुद्दाम काहीतरी विषय काढून त्याला बोलायला लावायचे....

चांगला हसीमजाक चालला होता... मयुर जास्त काही जेवला नाही.

भांग चा असर आणखीनच वाढत चालला... आता तर मयुर चा त्याच्या बोलण्यावर ताबा नव्हता.... त्याने पूर्ण रूम डोक्यावर घेतली.....

आता त्याच्यात mood swing दिसायला लागले....

           🤡  👺  😝  😱  😇  😠  🤑

मोठमोठ्याने हसायचा आणि हसता हसता अचानक ढसाढसा रडायला लागायचा... परत अचानक कोपऱ्यात शांत बसायचा परत उठायचा मोठमोठ्याने शिव्या द्यायचा.....

थोडक्यात काय तर भांग आता त्याला पूर्णपणे भिनली होती

पोटात गर्मी जाणवायला लागली, डोळे लाल झाले,घाम यायला लागला... तोल सुटायला लागला....

आता रूम वरचे सर्वजण मात्र घाबरले.... त्यांनी रूम च मुख्य दार आतून लॉक केलं... शरीराला इजा करतील अशा वस्तू जस की चाकू, चमचे, लाईटर, माचीस वगैरे सोबत घेऊन ते सर्वजण बेडरूम मध्ये गेले आणि आतून लॉक करून घेतलं.... आता हॉल आणि किचन मध्ये मयुर एकटाच थैमान घालत होता.... 

काहीतरी चुकतंय हे त्यालाही कळायला लागलं  😓😖😢..त्याने बाथरूम गाठलं... उलटी करण्याचा प्रयत्न केला... पण निष्फळ... फक्त कोरडी ओकारी यायची...

शरीराची होणारी आग आता त्याला सहन होईना...बाथरूम चा नळ चालू करून त्याने नळाखाली बसून घेतलं... हे सर्व करत असताना त्याची असंबद्ध बडबड चालूच होती.... बिच्चारा.....

संध्याकाळी सात ते बारा पर्यंतचा हा सर्व खेळ....

आयुष्यात कधी सुपारीच्या तुकड्यालासुद्धा हात न लावणारा मयुर आज खूप काही सहन करत होता.

                     ◆◆◆  ◆◆◆

हम्म....तर हा होता फ्लॅशबॅक.. चला आता मुख्य कथे वर

:

:

:

:

घाईघाईत मी जिना चढलो आणि दरवाजा वाजवला

मयुर ने दरवाजा उघडला आणि बोलला

"दवाखान्यात जायचंय"

मी आल्याचा आवाज ऐकून सर्व पोरं पण बाहेर आले....

ते सर्व पण दवाखान्यात जायच्या तयारीतच होते.

रस्ता ओलांडून पलीकडेच दवाखाना होता... पण तिथं जाणं योग्य वाटेना... सर्व जरा ओळखीचेच. त्यात कहर म्हणजे आम्ही सर्वच पोर तिथल्या एका नर्स वर लाईन मारायचो.. ... चुकून मयूर तिथं काही आगाऊ बोलला तर पंचायत नको व्हायला..

पण दुसरा काहीच पर्याय नव्हता.... सर्वानुमाताने आम्ही निर्णय घेतला आणि मयुर चा हात हातात घेऊन मी पुढे झालो.... त्याच्या स्पर्शातून मला त्याच्या मनातली भीती आणि खळबळ चांगलीच जाणवत होती.

काय म्हणताय वाचकमंडळी?..... तुम्हालाही यायचं दवाखान्यात..... तिथं काय घडलं हे समजून घ्यायला.... थांबा थोडं... आधी तुम्हाला दुसऱ्या एका फ्लॅशबॅक मधून फिरवून आणतो.....

               ◆◆◆ फ्लॅशबॅक २ ◆◆◆

हा तर त्याच कायेय... मी आताच सांगितलं ना की आम्ही सर्वजण त्या नर्स वर लाईन मारायचो... मागच्या आठवड्यातलाच किस्सा....

सर्वजण जेवायला बसलो होतो... मयुर मात्र खिडकीतच उभा होता...

मयुर चल जेवायला...

"आज काय तीच दर्शनच झालं नाही राव... लै बोर होतंय..."

"होणं राव.. काय दिसलीच नाय सकाळ पासून.. ती दिसली की कस अंगात करंट मारतय...."

"नीट बोल साल्या... वहिनीय तुझी ती...."

"ती कोणाची वहिनी आहे हेना एकदाच फायनल च करून टाकूया... "

"फायनल काय करायचं त्यात.... सांगितलं ना तुमची वहिनी म्हणून"... मयुर चिडला.

एक काम करू..... सर्वजण तिला प्रपोज करू ... कोणाला होकार येतं बघू... मग कळलंच कोणाची वैनी न कायेय ते

पहिला कोण प्रपोज मारणार ....

(मी काहीच बोललो नाही... त्याच कारण अस की मी तिला प्रपोज करून आता जवळपास चार महिने झाले होते... मला अस काही नाही चालणार.... या शब्दात तिने नकार दिला होता... नकार आल्यामुळे आता प्रपोज केल्याचं तरी कसं सांगणार ना...

इसीलीये आजतक वो राज का राज ही रहा🤣🤣...

आजपण मी दिसलो तर ती रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने चालणं पसंत करते.😛😆.... बर ती मला एवढी का आवडली... हे तुम्हाला कथेत पुढे वाचायला मिळेलच....

तूर्तास चालू द्या ह्या पोराचं काय चाललंय ते....)

"तुमच्यावर प्रपोज करायची वेळच येऊ देणार नाही मी भाड्या ओ..." मयुर कडाडला.... नेक्स्ट वीक च.... just wait n watch"

वाचकहो.....चला चला दवाखान्यात जायचंय ना आपल्याला..... बास .....एवढा फ्लॅशबॅक पुरेसा आहे आपल्याला

:

एक वाजला होता रात्रीचा.....सेक्युरिटी ला आवाज दिला, तो उठला.. बऱ्यापैकी ओळख होती त्याला घडला प्रकार सांगितला... त्याने लगेच डॉक्टर ना कॉल केला, ते वरतीच रहायचे.... डॉक्टर नि पेशन्ट ला आत घेऊन बेड तयार करायला सांगितलं... आम्हाला थोडं बर वाटल. मयुरची बडबड मात्र चालूच होती... असंबद्ध बडबड करताना मध्येच त्याला आपली चूकही जाणवायची....

"न्हाय रे, अशी चूक परत कधीच कधीच नाय करणार, भांग पासून चार हात लांब... माफ कर देवा".. डोळ्यात पाणी आणून, जीभ चावायचा आणि कान पकडायचा नकारात्मक मान हलवायचा.

मयुर ला या अवस्थेत नर्स नि बघितल तर त्याचा पत्ता कट होणार म्हणून पोर खुश होते.

बेड तयार झाला मयुर ला त्यावर झोपवला...

इतक्यात ट्रे मध्ये काही सामान स्टेथोस्कोप, थर्मा मीटर, काही औषध घेऊन तीच नर्स मयुर च्या बाजूला येऊन उभी राहिली.

आयच्या गावात🙄😱... आता झाली का पंचाईत... हिचीच बरी नाईट शिफ्ट होती आज.... पोर बिथरले आता, सगळं बाहेर निघणार....

मयुर ची नजर तिच्यावर पडली आणि तो उत्स्फूर्त पणे बोलला...

"ऐ जानेजिगर ...जाने तमन्ना..."

मी डायरेक्ट मयुर च तोंड दाबलं.... त्याची मान माझ्याकडे वळवली...

"अ..त्याच कायेय.. ते जरा भांग जास्त झाली त्याला मॅडम... त्यामुळे असच असंबद्ध काहीही बरळतोय तो... अ... ब..."

"ठीक आहे.. तुम्ही सोडा त्यांना... its ok... मला बघू द्या"

मी सोडलं आणि.......मयुर फिल्मी स्टाईल मध्ये..........

"आय लव यु 😍.... मेरी जिंदगी तुम्हारे बिना अधुरी सी है🤗🤗😚"

हे असंच बोलतोय तो संध्याकाळ पासून, विषयांतर करण्यासाठी आणि त्यातल गांभीर्य कमी करण्यासाठी अनिल बोलला...

ती हसली आणि तिने आपलं काम चालू ठेवलं..

सौंदर्याची जादू असते ना तस काहीतरी होत या मुलीत...

म्हणजे तुमचा ९०% आजार तर तिच्याकडे बघून तिच्याशी बोलूनच कमी होणार... याची १००% गॅरंटी😃. आणि तिची सुश्रुषा अशी की तुम्ही डिस्चार्ज नको म्हणाल..😎😎

तिने हाताने मयुर च्या कपाळावर मानेवर तापमान बघितलं, एक हात हातात धरला... दुसऱ्या हाताने त्याच्या डोक्यावरचे केस नीट करत बोलली.

"शांत पडून रहा... सगळं नीट होईल... काळजी करण्याची काही गरज नाही.. डॉक्टर येतीलच एवढ्यात..."

मी देखील मयुर चा दुसरा हात हातात घेतला आणि त्याला समजावू लागलो.... "घरच्यांना बोलावू उद्या काही काळजी करू नको." उग आपलं मी पण तुझ्याइतकाच काळजीवाहू आणि प्रेमळ आहे हे त्या नर्स ला दाखवण्याची माझी धडपड...(माझ्या प्रेमाला परत काही अंकुर फुटतोय का हे बघावं म्हटलं😜🤓... पण कसलं काय साध बघितलं ही नाही माझ्याकडे तिनं 😢😢) 

पण यावेळी मात्र मयुर ने माझा हात सपशेल झटकला..

"हम्म ठीक आहे, बघू सकाळी .".. तिच्या चेहऱ्यावरून नजर न हटवता तो बोलला.

मयुर ने तिचा हात चांगलाच आवळून धरला होता..

मोठं स्मितहास्य करत बोलला... "आता जरा बर वाटतंय"

इकडं पोरांचा नुसता जळफळाट ना....😡😡😠😠

 " च्या मारी आपण पण भांग प्यायला पाहिजे होती"...

एकमेकांच्या तोंडाकडे बघत पोर मुक्यानेच बोलली पण प्रत्येकाला समजल्या भावना एकमेकांच्या....

समदुःखी स्पर्म्स साले.

डॉक्टर आले, सर्व चेकअप वगैरे करून त्यांनी ट्रीटमेंट सुरू केली. काय द्यायचं काय करायचं याच्या सर्व सूचना त्यांनी नर्स ला दिल्या. आणि ते निघून गेले.

आम्ही केंव्हाचे उभे आहोत हे पाहून नर्स आम्हाला उद्देशून बोलली... "एकजण थांबा फक्त, बाकी तुम्ही सर्वजण गेलात तरी चालेल.. समोरच्याच बिल्डिंग मध्ये राहता ना तुम्ही?

सर्वांचे तोंडं बघण्यासारखे झाले होते..बाप रे.... अजून काय काय माहितीय मॅडम ना??

कसलाच अडसर नको म्हणून मयुर बोलला.. "सर्वजण गेलात तरी चालेल..समोरच तर आहेत, काही लागलं तर खिडकीतून आवाज देईल. (च्या मारी त्या खिडकीच्या तर...👿👿 )"

आम्ही आपलं लढाई हरल्या सारख माना खाली घालून तिथून निघालो. 🤕🤕☹️😖😖

                        ******†******

दुसऱ्या दिवशी मयूर चे आईबाबा सकाळी लवकरच आले.. काकूंनी जेंव्हा नर्स ला रात्री बघितलं, तिची बोलण्याची काम करण्याची पद्धत पहिली तेंव्हा त्यांनी सरळ तिचा हातात घेऊन

"अशी सुनबाई पाहिजे बघा "

म्हणत तिच्या डोक्यावरून हात फिरवला.. ...

आम्ही पोरं निराश होऊन मनातल्या मनात...."आहो काकू तुम्ही मयुर साठी आलात का आमच्या भावनांचं लोणचं बनवण्यासाठी.... 😢😢😖😖"

आता जी मुलगी आम्हा सर्वांना आवडू शकते ती काकूंना सुनबाई म्हणून का नाही आवडणार म्हणा...

ती नर्स लाजून आपल्या कामात व्यस्त झाली...

काळीजघाव ना राव डायरेक्ट....😢😭😭😵

आम्ही पोर आतल्या आत ढसाढसा रडत होतो....

मयुर नीट झाला..... त्याचे आईबाबा पण गावी गेले...

पण मयुर ची तब्बेत खूप सुधारलीय आता.. त्या नर्स ने स्पष्ट होकार वगैरे तर दिला नाहीच पण दररोज ड्युटीवर येताना घरून त्याच्यासाठी टिफिन घेऊन येते ....

आणि हा आमच्या नाकावर टिचून आम्हाला दाखवत टिफिन खातो....

साला ये प्यार ऐसी कूत्ती चीज है ना...... दोस्ती मे दरार लाती है। 🤧🤕🤥

आम्ही तुटलेल्या हृदयाचे तुकडे गोळा करतोय.... आणि हा हरामी " जितम जितम " करत सगळ्या रूम मध्ये उड्या मारत फिरत असतो.


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy