मुलांची खोडी
मुलांची खोडी


आज सकाळी नेहमीप्रमाणे सात वाजता संस्कृती लोंढे नावाची माझ्या वर्गातली मुलगी बाबांबरोबर आली.
डोळे पूर्ण पाण्याने डबडबले होते . ते बाबांकडे पाहत होती माझ्याकडे पाहत होती. तिला घरी पण जायचं आणि शाळेतही थांबायचं होतं. काय करावे तिला सुचेना. शेवटी ती वर्गात येऊन बसली.
डोळे पूर्णपणे पाण्याने भरलेले.सतत एकटक ती माझ्याकडे पाहत होती.
प्रश्न चालूच होते. बाई शाळा कधी सुटणार? बाई अभ्यास कधी देणार? बाई अभ्यास थोडाच द्या. तुम्ही मला खेळायला सोडणार ना?चित्र देणार ना? चॉकलेट देणार ना?
रडते प्रश्न विचारते, रडते प्रश्न विचारते. मी पण तुझ्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देत होते. हो बाळा अभ्यास देणार आहे. तू करणार ना छान अभ्यास. तुला खेळायला मी सोडणार. आधी अभ्यास मग खेळ. अभ्यास पण मी थोडा देणार आहे.चित्रही घेणार आहे.चॉकलेट पण देणार.
आज हिचा काय मूड दिसत नाही. हे माझ्या एव्हाना लक्षात आले होते. मी पुष्कळ तिच्या कलेने घेण्याचा प्रयत्न केला. पण आज ती काही ऐकायला तयारच नव्हती. सतत रड,रड चालू होती.
माझ्याजवळ यायची पदर ओढायची. माझा हात ओढायची. मला मिठी मारून बसायची. पण डोळ्यात मात्र पाणी,पाणी.
असा आज दिवसभर तिने काढला. मी पण तिची समजूत घालायची जागेवर बसवायची.समजूत घालायची जागेवर बसवायची.
असा एकंदर आजचा संस्कृती लोंढेचा दिवस रडत - कडत का होईना पण अभ्यास करत गेला.