Vasudha Naik

Others

2  

Vasudha Naik

Others

मनाचा ठाव

मनाचा ठाव

1 min
78


   मन चंचल,मन बावरे,मन धीट,मन भित्रे,मन साजूक तूप मऊशार,मन बावरे,मन सावरे ,मन अथांग सागर,मन खळखळती नदी,मन फुलपाखरू,मन पवन,मन कृष्णाची बासरी,मन अवखळ लेकरू ...अशा किती उपाधी देवू या मनाला...

  खरच मन आत्ता इथे तर आत्ता तिथे असे जाते.

  मन फुलपाखराप्रमाणे हवेत तरंगते.

फुलांचा सुगंध घेत दाही दिशात पसरून देणार .

  मन जणू कृष्णाची बासरी, फक्त चांगल्या गोष्टीचा विचार, त्यातून निर्माण होणार्‍या लहरी पावन होतात. मन शांत शांत होते.

   मन जणू अवखळ अल्लड वारा .कधी बागेत जातेय. तर कधी ढेबे वाड्यात पोहोचतेय. क्षणात भारतात तर क्षणात अमेरिकेला जावेकडे धावतय.

 या मनाबद्दल जेवढे सांगावे तेवढे कमीच आहे.

  मन वढाय वढाय

 जस पिकातल ढोर

  किती हाकला हाकला

  येत फिरून फिरून.....



Rate this content
Log in