ऋतुजा वैरागडकर

Comedy

4  

ऋतुजा वैरागडकर

Comedy

मिस्टर अँड मिसेस

मिस्टर अँड मिसेस

5 mins
414


नमस्कार वाचक मंडळी,

हसताय ना,

हसायलाच पाहिजे....

आज मी तुम्हाला हसवायलाच आले बर का.

मिस्टर आणि मिसेस ची गंमतशीर किस्से घेऊन तुम्हाला हसवणार आहे, चला तर मग बघूया यांच्या जीवनातले किस्से.

प्रवीण, आरती,आरतीचे सासू-सासरे आणि मुलगी कणिका अशी प्रवीनची फॅमिली एका मोठ्या बंगल्यात राहायचे.

 

कामाला रामू नावाचा माणूस होता, घरातली बरीचशी कामे तोच करून घेत असे आणि कपडे भांडयाला वेगळी एक बाई होती ती येऊन काम करून जायची बाकीच सगळं रामूच करायचा.

एका सकाळी खोली साफ करायला कनिकाच्या खोलीत गेला. कणिका ब्लॅंकेट ओढून होती, रामुला आवाज आला.

“मला ना पाऊस आवडतच नाही, सतत तुला माझ्यासोबत राहावं लागतं, नाही म्हणजे तू मला आवडतोस पण मग मनसोक्त भिजता येत नाही ना, तू नसलास तर निम्मित असतं म्हणून “ आय हेट यु” ह. ये रागावू नकोस रे..आय लव यु. हळूहळू तू मला आवडायला लागला आहेस."

 

हे सगळं संभाषण ब्लॅंकेटच्या आत सुरू होत, रामूने ते सगळं ऐकलं आणि गेला आरतीकडे.

“मॅडमजी...मॅडमजी." रामू

"काय झालं रामू ओरडायला." आरती

“मी कनिका बेबीच्या खोलीत गेलो ना तर मी.." रामू बोलता बोलता थांबला.

"सांग रामू.." आरतीने आवाज वाढवला.

"सांगतो मॅडम.."

रामुने सगळं सांगितलं.

“तू थांब मी बघून येते."

अस म्हणत ती निघाली. हा थांबतोय कसला, गेला तिच्या मागेमागे.

आरती कनिकाच्या खोलीत गेली, कनिका अजूनही ब्लॅंकेटच्या आत बोलत होती.

तीच ते बोलणं ऐकून आरतीचा पारा चढायला लागला ती ब्लॅंकेट काढून तिच्या कानशिलात देणार तितक्यात तिला तिच्या हातात छत्री दिसली.

“काय झालं मम्मा." कणिका

"तू आता कोणाशी बोलत होतीस." आरती

तिनी छत्रीकडे इशारा करत

“हिच्याशी."

दोघीही रामुकडे बघून हसायला लागल्या.

...............…........

 

रामूचा दिवस कामात जाई पण त्याला रात्री पिण्याची सवय होती, आता ह्याच्यासाठी रोज रोज पैसे कुठून आणायचे तर त्याने एक शक्कल लढवली.

प्रवीणला रोज रात्री उशिरापर्यंत बसायची सवय होती ( नुसती बसायची नाही ह सोबतीला त्याची ती राहायची ).

“रामू." प्रवीणने आवाज दिला.

“जी मालक." रामू

“पेग बनव, मी येतोच." प्रवीण

रामुने पेग बनवला, साहेब येईपर्यंत त्यानी एक दोन पेग पोटात रिचवले त्यात तेवढंच पाणी टाकून ठेवलं आणि साहेबांना आवाज देऊन चुपचाप किचन मध्ये जाऊन झोपला.

 

रामू रोज व्हिस्कीच्या बाटलीतील एक -दोन पेग पोटात रिचवायचा.आणि नंतर त्या बाटलीत तेवढेच पाणी ओतायचा.

प्रवीणला त्याचा संशय आला. पण तरीही त्याने त्याला काही म्हटले नाही.

रामूच आता हे रोजचच झालं होत.

एके दिवशी प्रवीण आरतीसोबत ड्राइंग रुममध्ये बसला होता.

प्रवीनने किचनमध्ये काम करत असलेल्या रामूला जोरात हाक मारली.

 

प्रवीण(ओरडून) : रामू...रामू

"काय मालक?" रामू किचनमधून

 

प्रवीण :"माझ्या बाटलीतून व्हिस्की काढून कोण पित आहे?" किचनमधून काहीच उत्तर येत नाही.

प्रविनने पुन्हा तोच प्रश्न विचारला.पण रामूने काहीच उत्तर दिले नाही.

प्रवीण रागातच किचनकडे गेला आणि रामूला म्हणाला

 

"हे काय चाललय?मी तुला हाक मारली तर ओ देतोस,पण पुढच्या प्रश्नाला काहीच उत्तर देत नाहीस.असे का?"

रामू :"मालक या किचनचे एक वैशिष्ठ्य आहे.कीचनमध्ये फक्त नाव ऐकायला येते .बाकी काहीच ऐकू येत नाही."

 

प्रवीण :"हे कसे शक्य आहे? ठिक आहे .आता मी किचनमध्ये थांबतो आणि तू मला ड्राइंग रुममधून प्रश्न विचार.मग बघ मी तुला उघडा पाडतो ते."

रामू ड्राइंग रुममध्ये आरतीच्या बाजूला उभा राहून जोरात ओरडतो.

रामू - "मालक."

प्रवीण -" हां बोल रे रामू."

रामू- "आपल्या कामवाल्या बाईला नवीन मोबाईल कोणी घेवून दिला?"किचनमधून काहीच उत्तर आले नाही.

रामू - तिला कारमध्ये बसवून फिरायला घेवून कोण गेले होते?”किचन पुन्हा शांतच

प्रवीण किचनमधून ड्राईंग रुममध्ये आला आणि म्हणाला.

"अरे ,हा तर खराच चमत्कार आहे.किचनमध्ये फक्त नावच ऐकायला येत आहे ,बाकी काहीच ऐकू येत नाही." 

….......................

 

रामू बाजारात गेला त्याने भाज्या विकत घेतल्या आणि परत येताना चोराने त्यांच्या हातातल पॅकेट चोरलं आणि धावयला लागला. थोड्या समोर जाऊन थांबला आणि त्याने विचार केला..

“मी याचा पॅकेट मारला तरी याने आरडाओरडा केला नाही की माझ्यामागे धावलाही नाही असं का?"

चोराने पटकन पॅकेट उघडला तिथे लिहून ठेवल होत.

“मी मूर्ख नाही पॅकेट मध्ये पैसे ठेवायला.”

त्याने रामू कडे बघितलं आणि वाकून नमस्कार केला.

 “धन्य हो तुम्ही, आयुष्यात पहिल्यांदा असा माणूस भेटला मला."

…...…..........................

 

कनिकाने रात्री सगळे झोपल्यावर फ्रीज मध्ये ठेवलेली आईसक्रीम खाल्ली. सकाळी तीच पोट खूप दुखायला लागलं ती जोरजोरात ओरडायला लागली, सगळे तिच्या खोलीत गेले.

“काय झालं ग?" आरती

“आई पोटात खूप दुखतंय." कनिका

“काय खाल्लसं?" आरती

कनिका बोलायच्या आधीच रामू हात वरती करून मी...

कनिका त्याला न सांगण्यासाठी इशारा करतो.

"मी सांगतो." रामू

“तुला काय माहित रे." आरती

“मला माहित आहे सगळं." रामू

“काय?..

“फ्रीजमधली आईस क्रीम गायब आहे."सगळ्यांनी तिच्याकडे बघितलं आणि हसायला लागले.

...…......................


“रामू माझा चष्मा दिसत नाही आहे रे, शोधून दे." -आजोबांनी रामुला हाक दिली.

रामूने सगळीकडे चष्मा शोधला, घरातल्या प्रत्येक व्यक्तीने आपापली खोलीही चेक केली. सगळीकडे शोधून झाल्यावर सगळे आजोबांजवळ आले.

“आजोबा चष्मा नाही दिसला."

आजी बोलल्या- "दिसनारही नाही."

“का हो आई?"

आजीने आजोबांच्या डोक्याकडे हात दाखवत

“हा बघा."

चष्मा आजोबांच्या डोक्यावरच होता. सगळे एकमेकांकडे बघून हसायला लागले.

................................

रामू सकाळी झाडांना पाणी घालत होता. पाणी घालता घालता तो गाणी गुणगुणत होता. सगळ्या झाडांना पाणी दिल्यानंतर शेवटच्या झाडाजवळ गेला. तिथे खाली बघून तो ओरडला...

"साप..साप.."

रामू धावत धावत आत गेला, सगळे हॉलमध्ये बसले होते. रामू ओरडत ओरडत आत गेला.

"काय रे रामू असा का ओरडतो आहेस?"

"मॅडम गार्डनमध्ये मोठा साप आहे."

सगळे धावत तिथे गेले.

बघितल्यानंतर सगळे जोराजोरात हसायला लागले .

साप नकली होता आणि हे सगळं कनिकाने केल होतं.

..........................................

आज आरतीकडे काही पाहुणे येणार होते. आरतीने रामुला साफ स्वयंपाकात काय काय बनवायचं ते सांगितलं आणि ती मार्केट मध्ये गेली.

रामूने सगळा स्वयंपाक तयार करून ठेवला आधी स्टार्टर मध्ये देण्यासाठी काही बनवून ठेवायचं होतं. याबद्दल आरती काहीच सांगून गेली नव्हती.

रामुने खूप विचार केला त्यानंतर त्याने पिझ्झा करण्याचं ठरवलं.

कणिकचा पिझ्झा कसा बनवायचा त्याने ऐकलं होतं. त्याप्रमाणे त्याने क्रिया सुरू केली.

रामुने छान बेस बनवला त्यावर सगळ्या भाज्या टाकल्या, बाकी जे जे टाकायचं होतं सगळं टाकून झालं. रामुने ते ओव्हन मध्ये ठेवलं.

थोड्या वेळाने आरती मार्केट मधून आली,

"रामू सगळं तयार झालय ना?"

"हो मॅडम सगळं झालंय."

"स्टार्टर काय बनवलस?"

"पिझ्झा."

"अरे वा." अस म्हणून ती तिच्या खोलीत निघून गेली.

थोड्या वेळाने प्रवीण आला.

"आरती सगळं रेडी आहे का?"

"हो ऑलमोस्ट सगळं रेडी आहे."

दोघेही तयार होऊन बसले.

काही वेळाने पाहुणे आले,

"या या बसा."

सगळे आत आले, बसले.

रामुने पाणी आणलं. सगळ्यांच्या गप्पा सुरु झाल्या.

रामुने स्टार्टर आणलं.

पाहुण्यांनी खायला सुरुवात केली आणि ओकाऱ्या काढायला लागले.

काय झालं?

बघितलं तर पिझ्झा कच्चा होता. रामुने ओव्हन सुरू केलंच नव्हतं. सगळ्यांना रडावं की हसावं कळेना.. सगळे जोरजोरात हसायला लागले.



समाप्त:

काय मंडळी हसलात ना..मी तर पोट धरून हसले...विनोदी कथेचा माझा हा पहिलाच प्रयत्न होता , तुम्हाला ही विनोदी कथा कशी वाटली कंमेंट मध्ये नक्की कळवा...

धन्यवाद

 



Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy